शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाज शोधतोय दगडात देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:18 IST

दगडाच्या घरगुती वस्तू बनवून आपली उपजीविका चालविणारा वडार समाज आजही उपेक्षित आहे.

बीपीएल यादीत नाव नाही : आंध्र प्रदेश, कर्नाटकात सवलती, महाराष्ट्रात भोपळाधामणगाव(रेल्वे) : दगडाच्या घरगुती वस्तू बनवून आपली उपजीविका चालविणारा वडार समाज आजही उपेक्षित आहे. सर्वांना समान न्याय मिळावा, यासाठी शासन प्रयत्न करीत असताना शासकीय लाभापासून वडार समाज वंचित असल्याचे चित्र आहे. दिवसभर दगड फोडूनही पुरेसा मोबदला नाही़, संगणक युगात मिक्सरमुळे वरवंटा-पाट्याला भाव नाही, राजकीय पाठबळ नसल्याने बीपीएल यादीत नाव नाही़ एकीकडे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या सवलती मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात केवळ भटक्या, विमुक्त जमातींच्या सवलतीचा भोपळा मिळत असल्याने ब्रिटीशकाळात लागलेला गुन्हेगारीचा शिक्का मोडायचा कसा, असा प्रश्न निर्माण करून राज्यातील ७५ लाख वडार समाज आज संघर्षातून दगड फोडत यातून देव शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे़आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात अनुसूचित जाती-जमातींच्या सवलती मिळत आहेत. तेथील समाजाची आर्थिक, शैक्षणिक स्थिती उंचावली आहे़ मात्र, महाराष्ट्रात विमुक्त, भटक्या जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी यासमाजाला धावपळ करावी लागते़ राज्य शासनाने अनुसूचित जमातींच्या सवलती द्याव्यात जातीच्या दाखल्याची १९८१ ची जाचक अट रद्द करावी, समाजासाठी गायरान जमीनीचे आरक्षण ठेवावे, नॉन क्रिमिलेअर उत्पन्न मार्यादा वाढवावी, समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी वडार समाजाकडून होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)पारंपरिक व्यवसायावर गडांतर पूर्वीच्या काळात राजवाडे, किल्ले आपल्या कलाकुसरीने तयार करणाऱ्या वडार समाजाचे देशभरात मोठे योगदान आहे़ खाणकाम, मातीचे काम, वाळू दगडबांधकाम, विहीर खोदणे, दगड फोडणे, वरवंटे पाटे तयार करणे, असे या समाजाचे पारंपारिक काम आहे. मात्र, आधुनिकीकरणामुळे व्यवसायावर गंडातर आले आहे.गुन्हेगारीचाही संशयआज या गावावून त्या गावाला जाताना रहिवासी दाखला सोडाच एखाद्या गावात चोरीची अथवा कोणतीही घटना घडली तर गुन्हेगारीच्या संशय घेऊन या समाजाच्या कुटूंब प्रमुखाला अडकविले जात असल्याचे प्रकार मागील अनेक वर्षात घडले आहेत. हा प्रकार अत्यंत दुर्देवी असून समाजाला न्याय मिळवा.