शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बीटींचा आम्हाला आशीर्वाद !

By admin | Updated: January 16, 2017 00:07 IST

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बी.टी. देशमुखांचा आम्हाला आशीर्वाद आहे, ...

संजय खोडके : पत्रपरिषदेतून व्यक्त केला विश्वास, काँग्रेसची वाटचाल सुकर अमरावती : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बी.टी. देशमुखांचा आम्हाला आशीर्वाद आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संजय खोडके यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केला. काँग्रेसच्यावतीने पदवीधर मतदार संघातून १७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमिवर खोडके यांनी पत्रपरिषदेतून भूमिका माडली. संजय खोडके यांनी समविचारी पक्ष, संघटनांच्या पाठिंब्यावर पदवीधर निवडणूक काबीज करणार असल्याचा दावा केला. राज्यातील भाजपचे सरकार हे शिक्षक-पदवीधरांच्या अहिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळेच औरंगाबाद येथे न्याय मागण्यास गेलेल्या शिक्षकांवर लाठीहल्ला करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पहिल्यांदाच लढवीत आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यात नोंदणी झालेल्या पदवीधर मतदारांच्या आकडेवारीनुसार ही निवडणूक कठीण नाही, असे खोडके म्हणाले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी नामांकन अर्ज सादर करताना उपस्थित राहतील. त्यानुसार नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. थेट अनुशेषाच्या मुद्यावर बोट ठेवताना संजय खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अनुशेषाचा प्रश्न विसरले आहेत. बी.टी. देशमुखांनी विधानपरिषदेत सर्वच बाबींचा अनुशेष दूर करण्यासाठी लढाई लढली. मात्र, त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांनी अनुशेषाचा मुद्दा गुंडाळून ठेवल्याचा आरोप संजय खोडके यांनी केला. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात पदवीधर बेरोजगांचे प्रश्न, अनुशेष, शिक्षकांचे प्रश्न व समस्या आदींचा समावेश राहील, असे ते म्हणाले. बी. टी. देशमुखांनी ‘पदवीधर’च्या निवडणुकीसाठी आम्हाला आशीर्वाद दिला असून अधिकृत पाठिंब्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. 'नुटा' ही पदवीधरांची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. मात्र, बीटींचा आम्हाला आशीर्वाद आहे, असा दावा खोडके यांनी केला आहे. पत्रपरिषदेला महापौर चरणजित कौर नंदा, संगीता शिंदे, माजी आमदार सुलभा खोडके, भोजराज काळे, गाजी जहरोश, दिलीप कडू, नितीन चव्हाळे, ललित चौधरी, दादाराव टवलारे, विकास दवे, शरद तिरमारे, संजय आसोले, बुरघाटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)