शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयच्या आशीर्वादाने गोवंश वाहतूक ?

By admin | Updated: May 10, 2017 00:05 IST

एकीकडे राज्य शासनाने गोवंश वाहतुकीवर बंदी घातली असताना दुसरीकडे एका पोलीस उपनिरीक्षकाने या कायद्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मोठे अर्थकारण : वरिष्ठांना कुणकुण लागल्याने थातूरमातूर कारवाईचा देखावा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकीकडे राज्य शासनाने गोवंश वाहतुकीवर बंदी घातली असताना दुसरीकडे एका पोलीस उपनिरीक्षकाने या कायद्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविला आहे. सदर पीएसआय गोवंश वाहतुकीच्या मोबदल्यात मोठे अर्थकारण साधत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही बाब पोलीस प्रमुखांपर्यंत पोहोचल्यामुळेच त्या उपनिरीक्षकाने मंगळवारी पहाटे कारवाई करून स्वत:वरील बालंट टाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकारही समोर आला आहे.पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्याकडे गुन्हे शाखेचा पदभार असताना पोलीस आयुक्तांच्या निर्देशाने गोवंशाची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. शहरातील नांदगाव पेठ, लालखडी रोड, भातकुली रोड व वलगाव पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करण्याचे निर्देश होते, तर बडनेरा येथे एक पथक पेट्रोलिंगसाठी देण्यात आले. काही दिवस नाकाबंदी करून पोलिसांनी अनेक वाहनांवर कारवाई केली. मात्र, कालांतराने कारवाई मंदावली. शहरात पुन्हा गोवंशाची वाहतूक सुरू झाल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईवरून लक्षात येते. दरम्यान गोवंश वाहतुकीसाठी एक पोलीस उपनिरीक्षकाने गोवंश वाहतूक करणाऱ्यांशी संगनमत करून चिरीमिरी घेण्याचा प्रकार चालवला. हनुमान जयंतीच्या दिवशी पोलिसांद्वारे आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात दोन पोलीस निरीक्षकांच्या चर्चेदरम्यान संबंधित पोलीस उपनिरीक्षक पैसे घेऊन गोवंश वाहतुकीस पाठबळ देत असल्याची बाब पुढे आली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. मध्यप्रदेशातून आणली जातात जनावरेअमरावती : संबंधित पीएसआय कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. माहिती मिळताच पीएसआयने मंगळवारी अवैध वाहतुकीवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून गोवंश मिनीट्रकद्वारे अमरावतीत आणली जाते. शहरात कत्तल केल्यानंतर जनावरांचे मांस वाहनात टाकून नागपुरी गेट परिसरातून भातकुलीकडे जाणाऱ्या सुकळीअंतर्गत मार्गावरून नेले जाते. त्यानंतर मूर्तिजापूरमार्गे अकोला मार्गापर्यंत पोहोचतात. तेथून हायवेने विविध दिशेने रवाना होतात. या कामासाठी घेतलेले पैसे प्रभात चौकातील एका छत्री दुरुस्ती करणाऱ्या इसमाजवळ दिले जातात. ट्रकमधून वाहतूक करणे जड जात असल्याने आता त्यांनी मिनीट्रकद्वारे वाहतूक होत आहे.गोवंश वाहतुकीसंदर्भात पोलीस काही गैरप्रकार करीत असतील तर तपास करू. खात्री केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.