शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

देशभरातील संशोधकांनी उघडले नवे ज्ञानदालन !

By admin | Updated: January 31, 2015 23:12 IST

मानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित

वैभव बाबरेकर - अमरावतीमानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बुद्धीला आव्हान देणारी अनेक संशोधने सामान्यजनांसाठी सादर करण्यात आलीत. देशभरातील विविध राज्यांतून २१६ संशोधकांनी विज्ञानाचे विविध अविष्कार अंबानगरीत उलगडून दाखविले. ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषेदेचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन.मालदार यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या परिषदेला देशभरातील ९ राज्यांतून २१६ संशोधकांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी १७२ संशोधकांनी रासायनिक प्रक्रियेवर आधारीत संशोधनांचे सादरीकरण केले. मानवी जीवनासाठी उपयोगी पडणारे पर्यावरणपूरक संशोधन दर्जेदार व स्वस्त किमतीत मानवाच्या कामी पडणारे आहे. मानवी जीवनातील अडीअडचणी लक्षात घेता संशोधकांनी तयार केलेली स्वस्त व दर्जेदार औषधीही यावेळी सादर करण्यात आलीत. ३५ वर्षांखालील वयोगटातील १६ विद्यार्थ्यांनी संशोधनाचे 'ओरल प्रेझेंनटेशन' केले. शनिवारी सकाळच्या सत्रात मुंबई येथील आयआयटीमधील संशोधक अरिधम चौधरी, लखनौचे अभिनव कुमार, दिल्लीचे प्रवीण इंगोले, वाराणसी येथील बनारस हिन्दू विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक सेन गुप्ता व अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे के.एस.चिखालीया यांनी आपापल्या विभागातील अविष्कारांचे सादरीकरण केले. २१० संशोधकांनी पोस्टरचे प्रदर्शन केले. देशभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या संशोधनकार्यामुळे अंबानगरीतील जिज्ञासू तरुणांना नवी उर्जा प्राप्त झाली.