मुख्याध्यापक सुरेंद्र बकाले, महावितरणचे गौरव निस्ताने, आरोग्य विभागाचे प्रफुल जुमडे, ग्रामसेवक प्रवीण वानखडे, अंगणवाडी सेविका लता ढाणके, आशा सेविका अर्चना भोयर, रोजगार सेवक अमोल भोयर, पोलीस पाटील सचिन फरकाडे, ग्रामपंचायत कर्मचारी भास्कर भोयर तसेच ग्राहक सेवा केंद्राचे संचालक मुकेश राठी यांचा गौरव अनुक्रमे सरपंच ममता राठी, उपसरपंच अलिम ऊर्फ अज्जू पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य अवधूत खडसे, दुर्योधन राघोर्ते, माधुरी हिंगे, माधुरी ठाकरे, वंदना घाटे तसेच शिक्षक रवींद्र निंघोट, योगिता किटकुले यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सदस्य व सर्व कोरोनायोद्ध्यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बचत समूह व ग्राम संघाच्या संजीवनी ढोले, योगिता भोयर, अर्चना मून, सोनू हिंगे, ढोक ज्ञानेश्वरराव राघोर्ते, रूपराव हिंगेसह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. संचालन उपसरपंच अज्जू पठाण, तर प्रास्तविक व आभार प्रदर्शन माजी सरपंच मुकेश राठी यांनी केले.
गव्हा फरकाडे येथे कोरोनायोद्ध्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:17 IST