शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:06 IST

खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देराष्ट्रपित्याला दीडशेव्या जयंतीला नमन चरख्यावर १० तास सूतकताई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.शहरातील जिल्हा उद्योग कार्यालय परिसरात सकाळी ८ वाजता सूत कताई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांनी येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. पालकमंत्र्यांनी चरख्यावर सूतकताई केली. येथे हात चरखा, पेटी चरखा, अंबर चरखा असे सुमारे ५० प्रकारचे चरखे होते. या महोत्सवाला मूर्त रूप देण्यासाठी कस्तुरबा समिती आणि शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले. सूतक ताई महोत्सवात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक नीलेश निकम, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर प्रामुख्याने उपस्थित होेते.चरख्याला मिळाले सौरऊर्जेचे बळराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशकाळात विदेशी वस्तू, साहित्य वापरावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. स्वदेशी हा मूलमंत्र देताना गांधीजींनी चरख्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. हातचरखा याला आजही गांधी चरखा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर गांधीजींनी पेटी चरख्याची संकल्पना साकारली, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने हाताळता येईल. १९६० च्या सुमारास अंबर चरखा अस्तित्वात आला. ही आताच्या सोलर चरख्याची पहिली पायरी होती. नंतर सौरऊर्जेचे बळ मिळून सौर चरखा अस्तित्वात आला. आज गाव-खेड्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून चरख्याद्वारे सूतकताई आणि वस्त्रनिर्मितीचे दालन उभे झाले आहे. खादी वस्त्रांना महानगरातही मागणी वाढली असून, रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.