शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव अन् भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:56 IST

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे,

ठळक मुद्देभारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, असे दोन ठराव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवार, २७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सभेत पारित केले.भाऊसाहेबांच्या ११९ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सभेत शहर काँग्रेस कमिटीने महत्त्वाचे ठराव घेतले. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने चौबळ वाडा येथील पक्ष कार्यालयात सर्वप्रथम भाऊसाहेबांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.किशोर बोरकर यांनी आपल्या मनोगतातून राज्यघटना समितीचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात यावे, बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, भाजपक्षाचे राज्यमंत्री अनंत हेगडे यांनी देशाचे संविधान बदलविण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे ठराव मांडले. वरील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.सभेला उपस्थित आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख म्हणाले की, डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून काम करताना देशभरातील शेतकºयांना न्याय दिला. याशिवाय शिक्षणक्षेत्रात एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असताना भाऊसाहेबांनी त्या काळात वाङ्मयात पीएच.डी. करून प्रस्थापितांना आपल्या बुद्धिचातुर्याचा परिचय दिला. गोरगरीब, उपेक्षित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून खेड्यापाड्यात बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. देशातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित केल्याचे ते म्हणाले.यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू गणेश पाटील, प्रल्हाद ठाकरे, भय्यासाहेब निचल, अर्चना सवाई, अखिल भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस भैया पवार, आसिफ मंसुरी, बाबर कुरेशी, ऋषिराज मेटकर, अभिनंदन पेंढारी, यासीर भारती, संकेत कुलट, संकेत बोके, भाऊराव पोटे, निसार अहमद मंसुरी, नदीम मुल्ला, वंदना थोरात, अनिला काझी, कुंदा अनासाने, हसिना शाह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचालन दीपक हुंडीकर यांनी केले. आभार प्रदर्शन नसीम खान यांनी केले.