शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 23, 2017 00:07 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

राकाँतर्फे निवेदन : सुप्रिया सुळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जपुरवठा करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यासंदर्भात गुरूवारी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.सध्या अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. ३ वर्षांपासून सतत नापिकी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय दहा हजारांच्या मदतीच्या अटी व शर्ती जाचक आहेत. व बँकांचीसुध्दा परिस्थिती बिकड आहे. त्यामुळे शेतकरी शेती पेरण्यास त्यांची कुठलीही व्यवस्था नाही. पडीक शेती अधिक प्रमाणात राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती राहिल्यास जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, ही सर्व बाब लक्षात घेता शासनाने विनाविलंब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व पूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जसुद्धा द्यावे, अशी मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी विद्यानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, वसंत घुईखेडकर, वसुधा देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, बाबा राठोड, भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, अरूण गावंडे, गणेश खारकर, नितीन शेरेकर, प्रदीप राऊत, नंदकिशोर रेखाते, सतीश ढोरे, प्रमोद झाडे, स्मिता घोगरे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.