शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:55 IST

तालूक्यातील झाडगाव येथे पांडुरंग बंडूजी राऊत (८५) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना पाच विवाहित मुली असून, त्या आपापल्या गांवी राहतात. पण, म्हातारे आइर्-वडील झाडगाव येथेच राहत होते.

ठळक मुद्देसमाज रुढीला झुगारत दिला भडाग्नी : मुलांप्रमाणे बजावले कर्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालूक्यातील झाडगाव येथे पांडुरंग बंडूजी राऊत (८५) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना पाच विवाहित मुली असून, त्या आपापल्या गांवी राहतात. पण, म्हातारे आइर्-वडील झाडगाव येथेच राहत होते. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या पाचही मुली आईवडीलांना मुलाप्रमाणे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना सर्व सुखसोई पुरवित होते. त्यामुळे म्हाताऱ्या आई-वडीलांना कधीच मुलाची उणीव भासू दिली नाही. वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी मुलींना कळताच त्या आपल्या संपूर्ण परिवारासह माहेरी आल्या. लाडक्या वडिलांच्या अंतिम संस्काराची तयारी केली. यावेळी समाजातील अंधरुढीला झुगारून आपल्या लाडक्या वडिलांच्या पार्थिवाला पाचही मुलींनी खांदा दिला.पांडुरंगजी राऊत यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मात्र मुलींनी मुलाचे कर्तव्य बजावत समाजाच्या अंधरुढीला झुगारून चार मुलींनी खांदा दिला. एका मुलीने आगट हाती घेतले होते. घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत आपल्या वडिलांचे पार्थिव खांद्यावर घेऊन थेट शेवटचा अंतिम क्षण श्रद्धापूर्वक वडिलांच्या पार्थिवाला पाचही मुलींनी अग्नी दिला. त्यांनी समाजातील रुढी पंरपंरेचे बंधन झूगारुन मुलींनी समाजाला नवी प्रेरणा दिली तर त्यांच्या साथीला त्यांचे पतीदेव सुद्या उपस्थित होते.जगात दु:ख आहे. मृत्यू सत्य आहे. या दु:खाचे निवारण कसे करावे, यावर उपाय काय? याचा शोध आणि बोध घेऊन पुष्पा नागरकर,बेबिताई माडंवगडे,माया कोंडलकर, वंदूताई रामटेके, संगीता मारडकर या मुलींनी आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार केला. त्यांच्या धाडसी कर्तबगारीने समाजाला एक नवी प्रेरणा व दिशा मिळाली. धन्य त्या मुली ज्यांनी वडिलांना मुलगा नसल्याने मुलींनी मुलाचे कर्तव्य पार पाडले. पांडूरंगजी राऊत यांच्या मागे पत्नी, पाच मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.