शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर ‘फेक’अकाऊंट तयार करून विद्यार्थिनीचा छळ

By admin | Updated: January 15, 2016 00:23 IST

फेसबुकवर विद्यार्थिनीच्या नावे ‘फेक’ अकाऊंट तयार केले. त्यावर आलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्टही स्वीकारल्या.

संदीप मानकर अमरावतीफेसबुकवर विद्यार्थिनीच्या नावे ‘फेक’ अकाऊंट तयार केले. त्यावर आलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्टही स्वीकारल्या. त्यानंतर या अकाऊंटवर अश्लील संदेश आण छायाचित्रे येण्यास सुरूवात झाली. परिणामी विद्यार्थिनीची बदनामी झाली. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर हे फेक अकाऊंट तयार करणाऱ्या आरोपीला सायबरसेलच्या पोलिसांनी १२ जानेवारी रोजी अटक केली सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोबतच सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. सायबर सेल अमरावती ग्रामीण पोलिसांना चार महिने सलग तपास करुन हा किचकट गुन्हा उघडकीस आणला. सचिन सुधाकर गायगोले वय (२७,रा.लोणी) याने येथीलच एका विद्यार्थिनीच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्या अकाऊंटवर इतरांच्या फ्रेन्ड रिकवेस्ट स्वीकारल्या. काही दिवसांनी त्या अकाऊंटवर अनेक अश्लील साहित्य व संदेश येऊ लागले. विद्यार्थिनीच्या इतर मैत्रीणींकडून तिला ही बाब कळली. विद्यार्थिनीच्या मानसिकतेवर परिणामअमरावती : तोवरही बाब तिच्या ओळखीच्या लोकांमध्ये कर्णोपकर्णी झाली होती. या बाबीचा विद्यार्थिनीच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाली. तिची आणि तिच्या कुटूंबाची मनोदशा बिघडली. महाविद्यालयात जाणेही ती टाळू लागली. हा प्रकार वाढल्याने अखेर तिने लोणी पोलिसांत धाव घेतली. लोणी पोलीस ठाण्यात तिने तक्रार नोंदविली १ सप्टेंबर २०१५ रोजी त्या विद्यार्थिनीला हा प्रकार कळला होता. लोणी पोलिसांनी याप्रकरणी ५ सप्टेंबर २०१५ ला याप्रकरणी आयटी अ‍ॅक्टनुसार ६६(सी) गुन्हा दाखल केला होता. लोणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण सायबर सेलकडे सोपविला. ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम व अप्पर पोलीस अधिक्षक एम.एम.मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक विशाल खलसे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद राऊत, राजेंद्र पंचगाम, मोहन मोहोड, सुधीर पांडे, अमित वानखडे, शाम गावंडे आदींनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.