लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात बिनधास्तपणे फिरणाऱ्या मुलींनो, सावधान व्हा! मुलींना छेडणारा विकृत तरुण शहरात फिरत आहे. या तरुणाचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले असले तरी त्याला कुणीच ओळखत नाही. त्यामुळे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याचा फायदा घेत तो आणखीही गैरकृत्ये करू शकतो. तेव्हा अमरावतीकरांनी तुमच्या-आमच्यामध्ये वावरणाऱ्या या विकृत तरुणाला ओळखून पोलिसांच्या स्वाधीन करावे२, असे आवाहन फ्रेजरपुरा पोलिसांनी केले आहे.पोलीस सूत्रांनुसार, पुलवामा शहिदांना अमरावतीकरांनी चांदूर रेल्वे रोडवरील व्यंकटेश कॉलनीत श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलीला संधी शोधून या मनोविकृताने गर्दीबाहेर काढले आणि कॅम्प परिसरात मुलीची छेड काढली. पीडिताने धोका ओळखून स्वत:ची सुटका करून घेतली आणि फ्रेजरपुरा पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शहीद श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थितांची चौकशी करण्यात आली. तेथील काही छायाचित्रे पोलिसांनी पीडित मुलीला दाखविले. त्या छायाचित्रावरून मुलीने आरोपीची ओळख पटविली. मात्र, खेदाची बाब म्हणजे, त्या छायाचित्रात असणारे अन्य नागरिक त्या तरुणाला ओळखतच नव्हते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.दरम्यान, ते छायाचित्र पोलिसांनी माध्यमांना दिले, सोशल मीडियावर व्हायरल करून आरोपीबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अद्याप त्या तरुणाविषयी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.येथे करा संपर्कउंच, सडपातळ बांधा, काळे केस असे वर्णन असणाºया हा तरुण कुठे आढळल्यास त्वरित फ्रेजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या ९८३४४८५६२९ या मोबाइल क्रमांकावर सपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.काय घडले १८ फेब्रुवारीला?एसआरपीएफ कॅम्प परिसरात १८ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी शहिदांना श्रद्धाजंली वाहिली. कार्यक्रम सुरू असताना अचानक वीजप्रवाह खंडित झाला. काळोखतच हा विकृत तरुण एका लहान मुलीजवळ गेला. एका नामवंत न्यूज चॅनेलसाठी तुमची मुलाखत घ्यायची आहे, अशी बतावणी केली. तिला काही अंतरावर असणाऱ्या गल्लीत नेले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी त्या अज्ञात तरुणाविरुद्ध विनयभंगचा गुन्हा नोंदविला.रेल्वेस्थानकावरून आॅटारिक्षाने पोहोचला वडाळीतअज्ञात तरुण रेल्वेस्थानकावरून एका आॅटोरिक्षात बसला. तेथून तो वडाळी गार्डनपर्यंत आला. त्यानंतर पायी तो आयोजित कार्यक्रमात गेला. पोलीस चौकशीदरम्यान एका आॅटोरिक्षाचालकाने ही माहिती पोलिसांना दिली.पोलिसांचे आवाहनशहरात वावरताना अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवा. खासगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमातही अपरिचित व्यक्तीला प्रवेश देऊ नका. कोणत्याही कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग काढून ठेवा. कोणी संशयित आपल्या कार्यक्रमात आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन ठाणेदार आसाराम चोरमले यांनी केले आहे.
मुलींना छेडणारा ‘तो’ विकृत शहरात फिरतोय मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:25 IST
शहरात बिनधास्तपणे फिरणाऱ्या मुलींनो, सावधान व्हा! मुलींना छेडणारा विकृत तरुण शहरात फिरत आहे. या तरुणाचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले असले तरी त्याला कुणीच ओळखत नाही. त्यामुळे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याचा फायदा घेत तो आणखीही गैरकृत्ये करू शकतो. तेव्हा अमरावतीकरांनी तुमच्या-आमच्यामध्ये वावरणाऱ्या या विकृत तरुणाला ओळखून पोलिसांच्या स्वाधीन करावे२, असे आवाहन फ्रेजरपुरा पोलिसांनी केले आहे.
मुलींना छेडणारा ‘तो’ विकृत शहरात फिरतोय मोकाट
ठळक मुद्देपोलिसांचे आवाहन : सतर्क राहा, दिसल्यास पोलिसांना कळवा