अमरावती : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत शिलाई मशीन, सायकल खरेदीच न करण्यात आल्याने या विभागासह कृषि विभागाचेही साहित्य खरेदीच्या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषद स्थायी समितिच्या सभेत चांगलेच वातावरण तापले. या शिवाय जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकाऱ्यांची बैठकीला गैरहजेर असल्याने या मुद्यावरही या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.जिल्हा परिषद स्थायी समिति सभा विविध विषयाला अनुसरून मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्ह्या परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, अभिजीत ढेपे, सतीश हाडोळे आदिंनी सभेच्या प्रारंभी सभागृहात स्थायी समितिच्या सभेला बहुतांश अधिकाऱ्यांची गैरहजर असल्याचा मुद्दा उपस्थित केला. एखाद्या विषयावर सभागृहात अधिकाऱ्यांविषयी सदस्यांनी काही अवमानकारक चुकून वक्तव्य केल्यास अशा मुद्यांवर सामंजस्याने तोडगा काढला जाऊ शकतो परंतु बहिष्कारासारखे प्रकार जर अधिकारी करत असेल तर संपूर्ण जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासनानेच चालवावा असा प्रश्नही त्यांनी अधिकाऱ्यांसमोर सभेत उपस्थित केला. हा प्रश्न अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या मध्यस्थिने निवडला. शासन निर्णयाचा आधार घेत शिक्षकांच्या बदल्या केल्या जात नाही, नियमानुसार ज्या काही मर्यादा आहे, त्या पूर्ण कराव्यात मात्र आपसी बदल्यांना विभागीय आयुक्तांची परवानगी असेल तर अन्य कुठलीही अडचण नसतांना अशी प्रकरणी निकाली काढणे गरजेचे असल्याचा मुद्दा प्रताप अभ्यंकर यांनी मांडला. अखेर या मुद्यांवर मुख्याधिकारी यांनी आवश्यक ती कारवाई या पुढे केली जाईल अशी शाश्वती दिली. या सभे मध्ये समाज कल्याणमार्फत गोरगरीब महिलांसाठी व शाळकरी मुलांकरिता दरवर्षी सायकल व शिलाई मशीन खरेदीची प्रक्रिया केली जातील मात्र या वर्षी या साहित्याची खरेदी करण्यासाठी कुठलीही कारवाई प्रशासनानी केली नाही, असा मुद्दा अभिजीत ढेपे, प्रताप अभ्यंकर यांनी उपस्थित केला. अशाच प्रकार कृषि विभागानेही केला आहे. त्यामुळे ही खरेदी तात्काल करावी. ज्या पुरवठाधाराने साहित्य पुरवठ्याचा करार केला आहे मात्र पुरवठा केला नसल्यास अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली. सभापति अर्चना मुरुमकर यांनीही बांधकाम विभागाच्या प्रश्नावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सभेला सुरेखा ठाकरे, जयप्रकाश पटेल, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, अर्चना मुरुमकर, सदस्य सतीश हाडोळे, प्रमोद वाकोडे, चित्रा डहाणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साहित्य खरेदीच्या मुद्यावर घमासान
By admin | Updated: July 22, 2014 23:47 IST