शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महापालिकेच्या शिरावर ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:04 IST

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या चार हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी कामास लागलेल्या महापालिकेच्या मानगुटीवर तूर्तास ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत बसले आहे.

ठळक मुद्दे१३ हजारांचे लक्ष्य : कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनिवार्य

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या चार हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी कामास लागलेल्या महापालिकेच्या मानगुटीवर तूर्तास ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत बसले आहे. महापालिकेला लोकसंख्येच्या तुलनेत १२,९४१ 'अ‍ॅप'चे उद्दिष्ट असून रविवारअखेर महापालिका क्षेत्रातून ६९३५ अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत. अर्थात ३१ डिसेंबरपर्यंत महापालिकेला ६ हजार अ‍ॅप डाऊनलोड करवून घेण्याचे आव्हान आहे.महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘जळी-स्थळी-काष्टी-पाषानी स्वच्छता अ‍ॅप दिसत असल्याचे हसरी प्रतिक्रिया उमटली असून हा अ‍ॅप डाऊनलोड करणे त्यांना बंधनकारक केले आहे. २०१८ च्या जानेवारी महिन्यात ४००० गुणांचे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. अधिकाधिक स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्याप्रमाणे समस्येचा निपटारा करणाºया महापालिका, नगर पालिकांना त्यासाठी ४०० गुण मिळणार आहेत. अ‍ॅप डाउनलोडिंगच्या रँकिंंगमध्ये शहर कुठल्या क्रमांकावर आहे, यावर हे गुणांकन ठरणार असल्याने अ‍ॅप डाऊनलोडिंगवर भर दिला जात आहे.महापालिकेत तूर्तास १६०० च्या संख्येत अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांश जणांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल आहेत. स्वच्छ सर्वेक्षण हे महापालिकेच्या गुणांकनासाठी अगत्याचे असल्याने प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाºयांना हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर स्वच्छता विषयक तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर आलेल्या तक्रार २४ तासांच्या आत सोडविणे अनिवार्य असून, ती तक्रार किती कालावधीत सोडविली गेली, यावरही गुण अवलंबून आहेत. २ आॅक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. स्वच्छ सर्वेक्षणाचे चौथ्या वर्षात देशातील ४,०४१ शहरे सहभागी झाले आहेत. यात स्वच्छतेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छता अ‍ॅपची सुरुवात झाली. शहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिक तक्रार करू शकतात. कचºयाचा फोटो काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास मनपाद्वारे २४ तासांच्या आत त्यावर कारवाई करण्यात येते. त्या तक्रारींचे निवारण योग्यरीत्या झाले नसल्यास नागरिक नकारात्मक अभिप्राय नोंदवू शकतात. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत किती स्वच्छता अ‍ॅप डाऊन लोड केले, त्या संख्येवर १५० गुण असले तरी लक्ष्यापेक्षा अधिक डाऊनलोडिंग आणि समस्यांचा निपटाºयाचा वेगावर ४०० गुण अवलंबून असतील.शहराला २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत १२,९४१ स्वच्छता अ‍ॅपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी स्वच्छता विभाग सतत कार्यरत आहे. आतापर्यंत ७ हजार अमरावतीकरांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करुन स्वच्छताविषयक तक्रारी नोंदविल्या आहेत.- हेमंत कुमार पवार,महापालिका, आयुक्त-तर वेतन कपातमहापालिकेतील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करावे, अन्यथा वेतन कपात करण्याचा अप्रत्यक्ष तंबीच प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मनपाचे अधिकारी - कर्मचारी असले तरी तेही अमरावतीकरच असल्याने त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग द्यावा, असा त्यामागची भूमिका आहे.