शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांना अटक करा

By admin | Updated: August 26, 2016 00:20 IST

धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थेद्वारा संचालित मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी प्रथमेश

अनिल गोंडाणे यांची मागणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनअमरावती : धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थेद्वारा संचालित मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी प्रथमेश सगणे याच्या नरबळी प्रकरणी संस्थानचे प्रमुख शंकर महाराज यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी रिपाइंचे माजी आमदार अनिल गोंडाणे यांनी केली आहे. याआशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले आहे.प्रथमेशच्या नरबळी प्रकरणाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असताना अद्यापही या घटनेला जबाबदार असलेल्या शंकर महाराजांना पोलीस प्रशासनाने अटक का केली नाही? असा सवाल माजी आ. गोंडाणे यांनी पोलिसांना केला आहे. प्रथमेश हा मागासवर्गिय असल्यामुळे नरबळीचे प्रकरण दाबल्या जात असेल तर या अन्यायाविरुद्ध रिपाइं (आठवले गट)च्यावतीने तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. शंकर महाराज आश्रमाची सीबीआयकडून चौकशी झाल्यास बरेच तत्थ समोर आल्याशिवाय राहणार नाही, असेही अनिल गोंडाणे यांनी म्हटले आहे. प्रथमेशचा गळा कापून जखमी करण्यात आले. हा काय प्रकार आहे, याचे वास्तव पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे असताना शंकर महाराजांना अभय दिला जात असल्याचे आरोपही त्यांनी केला. पिंपळखुटा येथील संस्थानचे अध्यक्ष शंकर महाराज हे आहेत. प्रथमेशचा नरबळी देण्याची घटना सुद्धा यापरिसरात झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी शंकर महाराज यांना ताब्यात घेवून चौकशी करावी, अशी मागणी अनिल गोंडाणे यांनी केली आहे. शंकर महाराज हे पैशाचा पाऊस पाडणार या भावनेतून प्रथमेचा नरबळी झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना पोलीस याप्रकरणाचे वास्तव जनतेसमोर का आणत नाही? असा सवाल त्यांनी निवेदनातून केला आहे. यावेळी रिपाइंचे समाधान वानखडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)