शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळू-बेलोरा वळण रस्ता वाहतुकीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:59 IST

बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार नाही, अशी माहिती आहे.

ठळक मुद्देविमानतळ विकासाने गाठला टप्पा : राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार

आॅनलाईन लोकमतअमरावती : बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार नाही, अशी माहिती आहे.बेलोरा विमानतळाच्या विकासकामांनी गती घेतली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्य मार्गावर कार्यारंभ झालेला जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. लांबीचा वळण रस्ता पूर्णत्वास आला आहे. नव्या वळण मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. पूल, रस्ता ओलांडणे, झेब्रा क्रॉसिंग, गावांची सीमा, गावांचे अंतर, पायदळ मार्ग अशी वाहतूक नियमावलींशी सुसंगत फलके वळण मार्गावर उभारण्यात आली आहे. वळण रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली की, यवतमाळकडे ये-जा करणारी वाहने ही राष्ट्रीय महामार्गाच्या बेलोरा टी पॉइंट येथून जळू व पुढे यवतमाळ-अमरावती अशी जातील. यानंतर जुना यवतमाळ मार्ग बंद केला जाईल. त्यानंतर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम प्रारंभ होईल, अशी माहिती बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक यांनी दिली. हा वळण मार्ग साबांविच्या नियंत्रणात बांधला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे हा वळण मार्ग मुख्य मार्गाशी केव्हा जोडणार, असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वळण मार्गामुळे जळू गावाला झळाळी आली आहे.‘बी अँड सी’ला आदेशाची प्रतीक्षाजळू ते बेलोरा वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी केव्हा सुरू करावा, याची केवळ प्रतीक्षा आहे. विशेषत: पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. रवि राणा यांच्या सततच्या प्रयत्नाने विमानतळाची विकासकामे मार्गी लागत आहेत. वळण मार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला असला तरी विधिवत शुभारंभाशिवाय या मार्गावरून वाहने धावणार नाहीत, हे वास्तव आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणात जळू ते बेलोरा वळण मार्गाला जोडले जाईल. वळण रस्त्याची निर्मिती म्हणजे बेलोरा विमानतळ विकासाचे महत्त्वाचे पाऊल आहे.- प्रवीण पोटेपालकमंत्री, अमरावती.