शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:59 IST

आरोग्याच्या सुविधा व योजनांचा खरा लाभ सामान्य व गरिब नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उपचाराअभावी गरिब नागरिक मोठमोठया आजाराला बळी पडत असतात. सामान्य व गरिब माणसासाठी राज्य व केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. शासकीय रुग्णालयामधून या योजनांचा प्रसार होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : रक्तदात्यांना ब्लड रिपोर्ट घरपोच, महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन, शेकडो रुग्णांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आरोग्याच्या सुविधा व योजनांचा खरा लाभ सामान्य व गरिब नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उपचाराअभावी गरिब नागरिक मोठमोठया आजाराला बळी पडत असतात. सामान्य व गरिब माणसासाठी राज्य व केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. शासकीय रुग्णालयामधून या योजनांचा प्रसार होणे आवश्यक आहे. रुग्णालयात येणाऱ्या गरिब माणसाला रुग्ण सेवेचा लाभ तर मिळालाच पाहिजे, मात्र जे व्यक्ती रुगणालयापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा नागरिकांपर्यत आरोग्याच्या सुविधा आरोग्य विभागाने पोहचवाव्या, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २३ व २४ जानेवारीला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे भव्य रोग निदान उपचार, आरोग्य प्रदर्शनी व महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. रवी धकाते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. लोकनाथ गिºहेपुंजे, मोहिनूर रहमान शेख, डॉ. आर. एन. खंडागळे, चंद्रशेखर भोयर, डॉ. सुनिता बढे, सुनिल कुरंजेकर, बाबा पटेल, डॉ. विशाखा गुप्ते, डॉ. जक्कल, भगवान मस्के उपस्थित होते.सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रोगनिदान उपचार व आरोग्य मेळावा आयोजित केल्याचे सांगून खासदार म्हणाले, गरिबांना खाजगी रुग्णालयात उपचार करणे आर्थिक दृष्टया शक्य होत नाही. अशा लोकांना एकाच ठिकाणी सर्व आजारांचे रोगनिदान व उपचार मिळावे म्हणून महाआरोग्य मेळावा ही संकल्पना अतिशय उत्तम आहे. या ठिकाणी येणाºया नागरिकांची सर्व प्रकारचे उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या आरोगयविषयक योजनांचा गरजुंना एकत्रित लाभ देण्यात यावा.सामान्य रुग्णांना सेवा देण्यात जिल्हा रुग्णालय शिखरावर असून या रुग्णालयात सर्व अत्याधूनिक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य विभाग डॉ. रवी धकाते यांनी केले. शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना सामान्य व्यक्तीसाठी असून या योजनांचा सुध्दा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. सामान्य रुग्णालय भंडारा येथे कॅथलॅब मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सामान्य रुग्णालयात दररोज हजार ते पंधराशे रुग्ण येत असून कमी मनुष्यबळात उत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्याधुनिक यंत्र सामुग्री या ठिकाणी उपलब्ध आहे. याचा लाभ रुगणांना देण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता असून या मागणीचा पाठपूरावा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हृदयरोग, मधुमेह, मुत्रपिंडांचे आजार, अस्थिरोग, मानसिक आजार, मिरगी, चर्मरोग, गुप्तरोग, एचआयव्ही, कान-नाक-घसा, नेत्र, गर्भाशयाचे आजार इत्यादी सर्व प्रकारच्या आजारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करुन रुग्णांवर औषधोपचार केला.रक्तदात्यांना मिळणार सुविधामहाआरोग्य मेळाव्यात ज्या नागरिकांनी रक्तदान केले आहे. अशा सर्व रक्तदात्यांचे ब्लड रिपोर्ट त्यांना घरपोच देण्याची व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयाने करावी, अशा सूचना खासदार मधुकर कुकडे यांनी दिल्या. रक्तदान केल्यानंतर ब्लड रिपोर्टसाठी वाट न पहाता रक्तदात्याने आपला पत्र व्यवहाराचा पत्ता नोंदवून द्यावा. जेणेकरुन प्रत्येकाला ब्लड रिपोर्ट घरपोच पाठविता येईल.