शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

जनरेटर बदलविले, कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:06 IST

मानवी आयुष्यरेखा घटविणाºया जनरेटर वापरावर 'लोकमत'ने बुधवारच्या अंकातून प्रहार करताच जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीने काही तासांत ते जनरेटर बदलवून नवे अत्यल्प प्रदूषण करणारे जनरेटर आणले.

ठळक मुद्दे- तर अधिकारीही दोषी : तक्रार का नाही? प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्पच

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी आयुष्यरेखा घटविणाºया जनरेटर वापरावर 'लोकमत'ने बुधवारच्या अंकातून प्रहार करताच जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीने काही तासांत ते जनरेटर बदलवून नवे अत्यल्प प्रदूषण करणारे जनरेटर आणले.मुद्दा असा उपस्थित होतो की, जनरेटर बदलविले परंतु सतत अनेक दिवस वातावरणात वायू आणि ध्वनीप्रदूषण पसरविल्याच्या मुद्यावरून जेपीई कन्स्ट्रक्शन्स कंपनीविरुद्ध कारवाई केव्हा केली जाणार?विजेसाठी गरज भासल्यास जनरेटर वापरू शकण्यास करारांतर्गत मान्यता आहे; तथापि कामाच्या निमित्ताने प्रदूषण करण्यास कदापिही मान्यता नाही. तब्बल दोन वर्षे चालणाºया या सिंमेंट रस्ता निर्मितीच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अभियंत्यांची देखरेख आहे. ज्या अमरावती शहरात हे 'आदर्श' काम होत आहे तेथे मुख्य अभियंता चंद्रशेखर तुंगे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे या सर्वच अधिकाºयांची कार्यालये आहेत. पाच जिल्ह््यांमधील वा जिल्हाभरातील कामांचे नियंत्रण आणि गुणवत्ता राखण्यासाठीच्या या तमाम अधिकाºयांच्या फौजेवरही नागरिकांच्या तोंडावर उडवावा तसाच जनरेटरच्या विषारी वायुचा धुराळा जेपीई कंपनी उडवित असेल, तर कुणावर कुणाचे नियंत्रण, असा प्रश्न निर्माण होतो.दीर्घकालीन आणि लक्षावधी नागरिकांशी संबंधित असलेले काम करताना त्याच्या अचूक नियोजनाची आखणी हे बांधकाम विभागाचे आद्य कर्तव्य असायला हवे. अमरावतीच्या बांधकाम खात्याला विशेष महत्त्व न देणाºया जेपीई कंपनीकडे नियोजन नाही. आश्चर्य असे की, उपअभियंत्यापासून तर मुख्य अभियंत्यापर्यंत कुणीही ते करवून घेण्याचे कर्तव्य बजावले नाही. कंत्राटदार कंपनीला वाटले म्हणून त्यांनी अवजड मशीन रस्त्यावर आणून ठेवले. काम न करताच दोन महिने वर्दळीचा मार्ग अडवून ठेवला. कंत्राटदाराला वाटले म्हणून विषारी वायू सोडणारे जनरेटर वापरणे सुरू केले. या तमाम प्रक्रियेवर कुण्याही अधिकाºयाने आक्षेप नोंदविला नाही.प्रदूषण कमी करणे हा शासनाचा महत्त्वपूर्ण अजेंडा आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रयत्नरत आहेत. येथे शासनाच्याच देखरेखीत अविश्वसनीयरीत्या प्रदूषण निर्माण केले जाते आणि तमाम अधिकारी त्यासाठी अनुकूल असतात, हे माहिती झाल्यास खुद्द पंतप्रधानही अचंबित होतील.जेपीई कंपनीने जाणीवपूर्वकरीत्या प्रदूषण पसरविले. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. या गंभीर मुद्याची दखल घेऊन मुख्य अभियंता चंद्रशेखर तुंगे यांनी कंत्राटदार कंपनीला त्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश द्यायला हवे. समाधानकारक उत्तर न आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शहर पोलिसांत त्यासंबंधी तक्रार नोंदविणे हादेखील बांधकाम अधिकाºयांच्या कर्तव्याचा भाग ठरतो. तसे होणार नसेल तर संबंधित अधिकारीच या मुद्याला बळ देत असल्याची भावना जनमानसात निर्माण होईल. अधिकारी कारवाईच्या कक्षेत येतील.