शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठन, पीक कर्जाबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 31, 2015 00:13 IST

कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज, पीक विमा याबाबतची माहिती सोप्या शब्दात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त.....

बैठक : जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचनाअमरावती : कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज, पीक विमा याबाबतची माहिती सोप्या शब्दात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज व पीक विम्याचा लाभ मिळेल, या दृष्टीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.बी. खोरगडे, वित्तीय साक्षरता प्रमुख एच. एम. चौबे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे जिल्हा समन्वयक एस.के. सिंह, स्टेट बँक आॅफ हैदराबादचे फिल्ड आॅफिसर सुधीर कुमार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य अधिकारी दीपक अलोणे, अलाहाबाद बँकेच्या जिल्हा समन्वयक रश्मी डोंगरे उपस्थित होते.अमरावती हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. गतवर्षी कर्जवाटप उद्दिष्टाच्या ६८ टक्के कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यात कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज, पीक विमा आदींची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सहकार विभाग, कृषी विभाग, बँक तसेच पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी तालुकास्तरावर किमान पाच मेळावे आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या. यावर्षी खरीप हंगामात १ हजार ६९५ कोटी ४४ लाख इतके कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, शेतकऱ्यांकडून कमितकमी कागदपत्रे घेऊन त्याला कर्ज द्यावे, १५ जूनपूर्वी कर्जाचे पुनर्गठन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिल्या.बैठकीत ज्या बँकांचे अधिकारी उपस्थित नव्हते, त्यांना खुलासा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यापुढे १० जुलैपर्यंत पीक कर्जाबाबत नियमित बैठका होणार असून त्यासाठी संबंधित बँक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)