शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात साधारण निधीची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:35 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. उत्पन्नाची साधने वाढविण्याऐवजी खर्चावर अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपासून साधारण निधीवर विद्यापीठाचा डोलारा चालत असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेत चर्चा : खर्चावर अकुंश आणण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. उत्पन्नाची साधने वाढविण्याऐवजी खर्चावर अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपासून साधारण निधीवर विद्यापीठाचा डोलारा चालत असल्याची माहिती समोर आली आहे.विद्यापीठात साधारण निधीत विद्यार्थ्यांकडून येणारे विविध शुल्क, परीक्षा अर्जाची रक्कम व अन्य रोख जमा होते. मध्यंतरी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला असताना याच शीर्षातून कर्मचाऱ्यांचे वेतन देत मार्ग काढला. मात्र, २ मार्च रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अनेक सदस्यांनी साधारण निधीची होणारी उधळण थांबविण्याची मागणी केली. साधारण निधीत येणारा पैैसा हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा असतो, अशी भावनादेखील व्यक्त करण्यात आली. आवश्यक असल्यास खर्च करा, पण साधारण निधीला छेद लावू नका, असे मत नोंदविण्यात आले. याशिवाय बजेटमध्ये शीर्षनिहाय निधीची तरतूद असतानाही खर्च होत नसल्याची बाब उपस्थित करण्यात आली. त्यामुळे खर्चावर बंधन घालण्यासह प्रात्यक्षिक परीक्षा निरीक्षकांवर वर्षाकाठी होणाºया साडेतीन कोटींवर बंधन आणण्याची मागणी करण्यात आली. अनावश्यक खरेदी थांबविल्यास खर्चावर निर्बंध येतील, असा सूर व्यवस्थापन परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी आवळला.येत्या अर्थसंकल्पात साधारण निधीत ९० ते ९२ कोटी जमा होण्याचे प्रस्तावित आहे, तर तितकीच रक्कम खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. याबाबत कुठला निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.जमा होणारी अंदाजित रक्कमपरीक्षा शुल्क - ३३ कोटी ६२ लाख ८५ हजार, विद्यार्थ्यांकडून येणारे शुल्क - ३८ कोटी २९ लाख ४४ हजार, महाविद्यालयांचे शुल्क १३ कोटी ४७ लाख ८९ हजार ५९ रुपये, शैक्षणिक विभागाचे शिक्षण व इतर शुल्क - १७ कोटी ५४ लाख १३ हजार, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ - १३ कोटी २८ लाख ९७ हजार, विविध खात्यावरील व्याज रक्कम २८ लाख ६८ हजार ३५१ रूपये, इतर किरकोळ प्राप्ती - १३ कोटी ५८ लाख ४८ हजार, वेतन व इतर कपात - २९ लाख ३१ हजार, कर्ज व अग्रीम - २१ कोटी ३९ लाख, केंद्रीय प्रवेश ८ लाख ४३ हजार ६३५ रुपये.साधारण निधी कमी झाला, असे म्हणता येणार नाही. परंतु, उत्पन्नात वाढ व्हावी, याबाबत उपाययोजना करण्याचे सूचविले आहे. अनावश्यक खर्चावर अकुंश लावण्याची मागणी केली आहे. यावर्षी अंदाजपत्रक विद्यार्थिभिमुख तयार केले जाणार आहे.- प्रदीप खेडकर, सदस्यव्यवस्थापन परिषद, विद्यापीठ.