शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गवळीपुरा पोटनिवडणुकीत ५२.६३ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 00:25 IST

महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणूक रविवारी पार पडली.

आज मतमोजणी : चार उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलअमरावती : महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणूक रविवारी पार पडली. ८ हजार ३७५ पैकी ४ हजार ४०८ मतदारांनी मतदान केले. एकूण ५२.६३ टक्के मतदान झाले असून सोमवारी मतमोजणी होणार आहे. यात चार उमेदवार भाग्य मतपेटीत सील झाले.या निवडणुकीत काँग्रेसच्या खातून बी शेख हातम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाहीन परवीन शेख करीम, अपक्ष बिलकीस बानो हमजा खान, आसीया अंजूम वहिद खान यांच्या तुल्यबळ लढत झाल्याचे चित्र आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ११.३० वाजतच्या सुमारास मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. यावेळी २५ टक्के देखील मतदान झो नव्हते. मात्र दुपारी ३ वाजेनंतर मतदान करण्यास एकच गर्दी झाली. विशेषत: महिला वर्गाची गर्दी लक्ष वेधणारी होती. सायंकाळी ४ वाजता मतदान केंद्रावर मतदानासाठी रांग लागली. सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या मतदानाच्या एकूण आकडेवारीनुसार ५२.६३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी वलगाव मार्गावरील अ‍ॅकॅडमिक हायस्कूल आणि डी.एड. कॉलेज हे दोन मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. मुस्लिमबहुल भागात ही पोटनिवडणूक होत असल्याने पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता. आयुक्त राजकुमार व्हटकर हे बारकाईने लक्ष ठेवून होते. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी मदन तांबेकर हे पोट निवडणुकीची संपूर्ण यंत्रणा हाताळत होते.