शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच अवॉर्डसाठी गावकारभारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:15 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ : दिमाखदार दुसरे पर्व, राज्यातील पहिलीच योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.बदलत्या गावगाड्याची नोंद घेणारा व बदलू पाहणाऱ्या गावखेड्यांना प्रेरणा देणारा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने गत वर्षापासून सुरु केला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच आदर्श सरपंच निवडून त्यांना गौरविण्यात आले़ यापूर्वी सरपंचांना गौरविणारी पुरस्कार योजना नव्हती.मागील वर्षी अठरा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. त्यात पाच हजाराहून अधिक सरपंचांनी सहभाग नोंदविला.सरपंचांनी त्यांच्या प्रस्तावात दिलेल्या कामांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्यात येऊन वेगवेगळ्या १३ कॅटेगरीमध्ये अगोदर जिल्हा व नंतर राज्य पातळीवर पुरस्कार देण्यात आले. गत २८ मार्चला मुंबईत राज्यस्तरावरील दिमाखदार सोहळ्यातग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विविध मंत्र्यांच्या हस्ते सरपंचांना गौरविले होते.गावांसाठी २५ लाखांची घोषणागत वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘सरपंच आॅफ द ईअर’ ठरलेल्या सरपंचाच्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त सरपंचांनी विकास कामांचे प्रस्ताव दिल्यास त्यांच्या ग्रामपंचायतला १० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती़जिल्हास्तरावर विजेत्या ठरलेल्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींसाठीही विविध योजनांच्या घोषणा मंत्र्यांनी उत्स्फूर्तपणे केल्या होत्या.अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत गतवर्षी ही योजना राबविण्यात आली. याहीवर्षी या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार पटकविण्यासाठी अनेक सरपंचांनी विविध योजना राबवत गतवर्षीपासूनच तयारी सुरु केली आहे.