शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात साकारणार गव्हाणकुंडचा सौरऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:16 IST

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, अशा विश्वास महावितरणच्या संचालकांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे२० मेगावॅटची उपलब्धी : २६ एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, अशा विश्वास महावितरणच्या संचालकांनी व्यक्त केला.महानिर्मिती अंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये सारखेच स्पेसिफिकेशन्स राहावेत, प्रत्यक्ष सौर वीज उत्पादनापासून वहनापर्यंतच्या विविध टप्प्यांवरील प्रशासकीय व तांत्रिक बाजूंवर सविस्तर चाचपणीसह प्रकल्पाची ई-निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून स्थापत्य स्वरूपाच्या कामांचा कार्यादेश कोराडीच्या स्थापत्य विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी २५ एप्रिल रोजी दिला. नागपूर विभागाचे मुख्य अभियंता (सौर) मिलिंद नातू यांच्या उपस्थितीत २६ एप्रिल रोजी गव्हाणकुंड येथे प्रत्यक्ष विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.प्रकल्पासाठी सुमारे ३० हेक्टर जागेच्या २० टक्के जमिनीचे समतोलीकरण, माती नमुने परीक्षण, माती परीक्षण अहवाल सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाºया विकसकाला डिझायनिंगकरिता पाठविण्यात आले. सोबतच २.५ किलोमीटरचा गव्हाणकुंड पोचरस्तादेखील पूर्ण करण्यात आला. प्राथमिक स्वरूपांच्या विकासकामांची प्राकलने यामध्ये सुरक्षा तार कुंपण, रस्ता कामे, नाल्यावरील पूल, उर्वरित जागेचे सपाटीकरण याबाबतचा पाठपुरावा कोराडी येथील स्थापत्य कार्यालयद्वारा मुंबई मुख्यालयाकडे सातत्याने करण्यात आल्याने कामाला गती मिळाली व आता प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी कामांना प्रारंभ झालेला आहे.मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, नियमित आढावामुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत असलेला हा सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. यामुळे मुख्यमंत्री या प्रकल्पाचा नियमित आढावा घेतात. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. अनिल बोंडे यांचाही सतत पाठपुरावा असल्याने प्रकल्पाला गती आली. महानिर्मितीने राज्यभरातील विविध सौरऊर्जा प्रकल्प उभारणीकरिता नागपूर, नाशिक, औरंगाबाद व पुणे अशा चार प्रादेशिक विभागांकरिता मुख्य अभियंत्याची स्वतंत्र पदे निर्माण केलेली आहेत.वीज प्रकल्प उभारताना टप्पानिहाय कामांचे नियोजन करावे लागते. या प्रकल्पाची उभारणी व कार्यान्वयन कालावधी अठरा महिन्यांचा असला तरी प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.- विकास जयदेवसंचालक, महावितरण (प्रकल्प)