शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

शेंदूरजनाबाजार येथील शंतनूचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

By admin | Updated: October 3, 2016 00:18 IST

तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील शंतनू ज्ञानेश्वर आसोडे...

तिवसा : तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील शंतनू ज्ञानेश्वर आसोडे या मिलीटरी सैनिक स्कूल पुलगावचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा सीएसआयआर दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याला मानवविरहीत रेल्वे गेट या प्रोजेक्टसाठी ५० हजार रुपये रोख रक्कम व मानचिन्ह व प्रमाणपत्र असा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला. शंतनू आसोडे हा इंडियन मिलीटरी स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. मागील वर्षापासून त्याने एक प्रोजेक्ट तयार केला. मॉडर्न टेक्नॉलॉजी इन इंडियन रेल्वे या मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगवर स्वयंचलित रेल्वे गेट उघडणे व बंद होणे, रेल्वेच्या चालकाद्वारे विद्युत निर्मिती करणे तसेच प्लास्टिक व इतर कचऱ्याचे व्यवस्थापन आदी घटकांवर काम करण्यात आले. या प्रकल्पाची नोंद वैज्ञानिक तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सी.एस.आय.आर. दिल्ली या संस्थेने घेतली. भारतीय रेल्वेला हा प्रकल्प उपयोगी पडू शकणारा आहे, असे प्रतिपादन करून नरेंद्र मोदी यांनी शंतनू आसोडे सोबत पाच मिनिट झालेल्या चर्चेत प्रोजेक्टची प्रशंसा केली. तसेच शंतनूने आपले मनोगत व्यक्त करताना आभाळाएवढ्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, शिक्षक जगताप, मुख्याध्यापक रविकिरण भोजने, वर्गशिक्षक अतुल वाकडे, पर्यवेक्षक नितीन कोठे यांना दिले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)