आयुक्तांचा निर्णय : अत्याधुनिक यंत्रसामग्री कंत्राटदारांची चाचपणी सुरूअमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गलगतच्या रहाटगाव टी पाँईट जवळील हॉटेल गौरी ईनचे अवैध बांधकाम पाडण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. या प्रशस्त हॉटेलचे अवैध बांधकाम पाडण्यासाठी अत्याधुनिक कंत्राटदाराची प्रशासन चाचपणी करीत आहे.हॉटेल गौरी ईनच्या बांधकाम आॅगस्ट महिन्यात मोजणी करण्यात आली होती. बांधकाम मंजुरीनुसार सदर हॉटेलचे अतिरिक्त बांधकाम असल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने रामपुरी कॅम्प झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार अतिरिक्त बांधकाम असल्याप्रकरणी गौरी ईनच्या संचालकांच्या नावे ८ नोव्हेंबर रोजी दंडात्मक रक्कमेची नोटिस बजावली होती. मात्र या नोटीसला गौरी ईनच्या संचालकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी गौरी ईनवर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. एकूण ३४०० स्के.मीटर मंजूर बांधकाम नकाशात होते. वास्तविकपणे अभियंत्यांनी मोजणी केल्यानंतर १३०० चौ. मीटर अतिरीक्त बांधकाम निघाले. परिणामी गौरी ईनविरुद्ध सात वर्षाची करआकारणी करताना २५ लाख रुपये दंड वसुलीची नोटीस बजाविण्यात आली होती. नोटिस बजावल्यानंतरही दंडाची रक्कम भरण्यात आली नाही. परिणामी या हॉटेलचे बांधकाम पाडण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्रीचा वापर केला जाणार आहे.आदित्यचा दंड ५९ लाखगौरी ईनचे बांधकाम मोजल्यानंतर लगतच्या हॉटेल आदित्य परमीट रुमच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली होती. आदित्यचे बांधकाम अवैध असल्याप्रकरणी महापालिकेने ५९ लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.लवकरच आदित्यचे बांधकाम पाडले जाईल.माळा, लॉन अवैधगौरी ईनच्या बांधकाम मोजणीदरम्यान वरचा माळा (टेरेस)व लॉनची निर्मिती अवैध निघाली आहे. १०.७० प्रतिफूट रुपयाप्रमाणे या अवैध बांधकामावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
गौरी ईनवर पडणार हातोडा
By admin | Updated: October 24, 2015 00:04 IST