शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आज घराघरात होणार गौरीचे आगमन

By admin | Updated: September 8, 2016 00:26 IST

गणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून...

तीन दिवस चैतन्यमयी वातावरण : पूजा-अर्चा, महानैवेद्य शुक्रवारी मोहन राऊत धामणगाव रेल्वेरूणुझुणत्या पाखराजा रे माझ्या माहेराआली गौराई अंगणी घाली लिंबलोण सडागणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून तीन दिवस या माहेरवाशिणी कुटुंबात सौख्य, समृद्धी व अखंड सौभाग्य प्राप्त करून देण्यासाठी घराघरात गौरीचे आगमन होत असून नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे़भाद्रपद महिन्याच्या मूळ नक्षत्रात तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो़ पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजा-अर्चा व तिसऱ्या दिवशी सौभाग्य लेणे देण्यात येते़ पौराणिक काळात कोलासूर नावाचा दुष्ट राक्षस स्त्रियांना अतिशय त्रास द्यायचा. सर्व स्त्रिया कंटाळून अखेर ब्रह्मा विष्णू, महेश यांच्याकडे गेल्या. तेव्हा परमेश्वराने कोलासूर राक्षसाचा नाश करण्याची जबाबदारी महालक्ष्मी देवीवर सोपविली. देवीने कोलासूर राक्षसाशी यु्द्ध करून त्यांचा वध केला़ व स्त्रियांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केले़, अशी आख्यायिका आहे़ गौरी स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करतात विहिरीवरून तिला वाजत-गाजत आणणे घरच्या सर्व भागात फिरविणे, प्रत्येक ठिकाणी रांगोळीची पाऊले रेखाटणे एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणून गौराईचे पूजन करणे अशा पद्धतीने पूजन केले जाते. विदर्भात उभ्या महालक्ष्मींचे पूजन केले जाते. काही ठिकाणी नुसते मुखवटे तर काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर अनेक कुंटंूबात महालक्ष्मींना पितळी किंवा लाकडी तथा लोखंडी स्टँडवर उभ्या करतात़ काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर पितळेचे तसेच लाकडाचे असतात़ अनेक ठिकाणी हात नसण्याची सुद्धा पध्दत आहे़ दोन गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा असे संबोधून दोघींच्यामध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडतात़ नवीन साड्या, नवीन मुकूट, गळ्यातील अलंकार, बागड्या, साड्यांचा असा सर्व नवा थाट पाहून डोळ्यांचे पारणे फिटते़ साड्या, गहू, तांदळाची रास, ओटी, फराळाचे पदार्थ, समोर ठेवण्यात येत असले तरी पहिल्या दिवशी अशा समृद्धीने सजलेली महालक्ष्मी तथा गौरी ही भाजी व भाकरीच्या नैवद्याने तृप्त होते़ पहिल्या दिवशी जागरण करून रात्रील जागविल्या जातात. नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अथवा सायंकाळी महालक्ष्मींना बंद दार करून जेवण देण्यात येते़ अक्षरश: वाढलेल्या प्रसादात बोटांचे ठसे दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले़ या दिवशी आंबील व प्रसादाला अधिक महत्त्व असते़ तिसऱ्या दिवशी राशीचा प्रसाद या कुटूंबात मित्र परिवारांना देण्यात येतो.