शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

सभा गुंडाळल्याने पेटले रण

By admin | Updated: September 4, 2016 00:18 IST

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण गुंडाळल्याने विरोधक व सत्ताधारी परस्पर आमने-सामने आल्याने शनिवारी ....

जिल्हा परिषद : विरोधी सदस्यांचा गोंधळ अमरावती : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण गुंडाळल्याने विरोधक व सत्ताधारी परस्पर आमने-सामने आल्याने शनिवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित सबागृहात गोंधळ उडाला. तीन महिन्यांनंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा न करताच सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या बळावर मनमानी केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला आहे.सर्वधारण सभेच्या विषय सूचिप्रमाणे मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे, कृषी विभागाच्या पीक संरक्षण योजनेच्या प्रस्तावास मान्यता देणे आदी विषयावर ही सभा बोलविण्यात आली होती. पीठासीन सभापती सतीश उईके यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेत वेळेवरच्या विषयावर कुठलीही चर्चा न करताच अध्यक्षांनी सभा आटोपल्याचे जाहीर करताच विरोधकांनी आक्रमक होऊन व्यासपीठासमोर गोंधळ घातला. अध्यक्ष साहेब आमच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करा, असे ओरडत होते. मात्र याला न जुमानता ही सभा गुंडाळून सत्ताधाऱ्यांनी बहुमाताच्या जोरावर सोईचे विषय मंजूर केलेत. यात जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, तिवसा आणि नांदगाव खंडेश्र्वर या तीन तालुक्यांतील झेडपीच्या रस्ते विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यासाठी सभेत एकतर्फी मंजुरी देऊन एनओसीचा ठराव मंजूर केला. त्यामुळे विरोधक संप्तत झाले. सत्ताधाऱ्यांचा हा तोरा असाह्य झाल्याने विरोधी सदस्यांनी याबाबत सीईओंची भेट घेऊन चुकीचे व चर्चा न करता घेतलेले ठराव मान्य करू नये, अशी मागणी केली. यावेळी सन १९९६-९७ मध्ये लोखंड खरेदीसाठी घेतलेल्या अग्रीमचे समायोजनासाठी लेखा शीर्षकांचे पुनर्जिवनसाठी ९ लाख २५,२२५ रूपयांच्या तरतुदीस मंजुरी द्यावी या ठरावासह ११ विषयांवर चर्चा न करताच चुकीचे ठराव मंजूर केल्याचा आरोप सुधीर सूर्यवंशी, माजी अध्यक्ष तथा सदस्य सुरेखा ठाकरे, अभिजित ढेपे, सदाशिव खडके, मनोहर सुने, प्रमोद वाकोडे, चंद्रपाल तुरकाने आदींसह विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे. गदारोळात मात्र सदस्यांचे अनेक विषय सभा गुंडाळल्यामुळे भरकटले. यावेळी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, महेंद्रसिंह गैलवार, मोहन सिंगवी, मोहन पाटील, प्रवीण घुईखेडकर, सदाशिव खडके,बापुराव गायकवाड, ममता भांबुरकर, ज्योती आरेकर, उमेश केने, श्रीपाल पाल, मंदा गवई, आशिष धर्माळे तसेच सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कैलास घोडके, संजय इंगळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, खातेप्रमुख किशोर साकुरे, प्रमोद तलवारे, आनंद दासवत उपस्थित होते.(प्रतिनिधी)बालमूत्यू प्रकरणाची चौकशी टेंब्रुसोंडा प्रा.आ.केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे पाच महिन्यांत या केंद्रांतर्गत ३० बालकांचा व एक माता मृत्यू झाल्यावरसुद्धा आरोग्य यंत्रणेतर्फे तज्ज्ञ व कायमस्वरुपी डॉक्टरासह, पदाधिकाऱ्यांचे शेरे फाडून फेकणे, औषधी नसणे आदी संताप व्यक्त करणाऱ्या बाबी उघडकीस आल्यात.मात्र आरोग्य यंत्रणा का गप्प आहे. असा सवाल सदस्य वनमाला खडके यांनी झेडपी सभेत केला. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत आरोग्य विभागाने दखल घेऊन या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करूण या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सभागृहात सांगितले.झेडपी आमसभेत वेळेवर जे विषय माझ्या परवानगीने सभागृहात ठेवण्यात आले. त्यावर चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात आला. मात्र विरोधकांनी जे आरोप केले ते तथ्यहीन आहेत. - सतीश उईके ,अध्यक्ष, जिल्हा परिषदवेळेवरच्या विषयावर चर्चा न करताच नियबाह्य ठराव घेतले. जिल्ह्यातील रस्त्याची स्थिती खराब आहे,मात्र तीन तालुक्याला एनओसी देवून इतरावर अन्याय करणे ही बाब योग्य नाही.- सुरेखा ठाकरे,सदस्य, जि.प.विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेतील त्याचे आक्षेप असलेल्या मुद्यावर चर्चा केली. मात्र त्याबाबत लेखी काही कळविले नाही. तक्रार असल्यास त्याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल - किरण कुलकर्णी, मुख्यकार्यपालन अधिकारी