शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात अग्नितांडव दोन दुकाने जळून खाक

By admin | Updated: June 2, 2014 00:36 IST

दर्यापुरातील बनोसा परिसरात शॉर्टसर्किटमुळे दोन दुकाने जळून खाक झाली.

दर्यापूर : ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी दोन तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत रेडीमेड कपडे व प्रसाधन वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. ही घटना रविवारी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली.

बनोसा परिसरात मेन रोडवर शेख साजीद मो. साबीर (३0) यांच्या मालकीचे साडी व रेडीमेड कपड्यांचे दुकान तर मो. अशपाक अ. रऊफ (३१) यांच्या मालकीचे बॉम्बे बँगल्स व कटलरीचे दुकान आहे. सर्वप्रथम बॉम्बे बँगल्सला रविवारी पहाटे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करीत बॉम्बे सेल कापडाचे दुकान जळाले. यामध्ये बॉम्बे सेल कापडाच्या दुकानाचे १५ लक्ष रूपयांचे तर बॉम्बे सेल बँगल्स व कटलरीचे १0 लाखांचे नुकसान झाले आहे. यात साड्या, रेडीमेड कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळीच दर्यापूर, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील अग्निशमनदलाचे बंब वेळीच पोहोचल्याने इतर दुकाने बचावलीत. आजबबाजूच्या दोन्ही दुकानांत अंदाजे कपडे व साड्या असा दीड कोटी रूपयांचा माल होता. घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच त्यांनी दर्यापूर पोलिसांना कळविले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, ठाणेदार जे. के. पवार, सहायक पोलीस निरीक्षक अरूण अग्रवाल यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी तलाठी स्वाती पांडे व गजानन पांडे, मंडळ अधिकारी रावसाहेब अवसरमोल यांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी)

जीवन प्राधिकरण आले मदतीला

दर्यापुरात दोन दुकानांना लागलेली आग ही दोन्ही मुस्लिम बांधवांच्या दुकानाला लागली परंतु मदतीसाठी सर्व समाज एकवटला होता. घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला तर जीवन प्राधिकरणशी संपर्क साधून नियोजित वेळेपूर्वी पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याने आगीवर पाणी ओतून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. येथील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

मदतीचे हात सरसावले

येथील रामेश्‍वर चव्हाण यांनी जेसीबी आणले व दुकानाचे शटर तोडले. संपूर्ण दुकाने टिनाच्या शेडचे असल्यामुळे टीनसुद्धा जळाले. बाळासाहेब हिंगणीकर, बळवंत वानखडे, नंदू गुल्हाने, ईश्‍वर बुंदेले, राजू बुंदेले, नगरसेवक असलम घाणीवाले, भाऊराव पारडे, पठाण, बबलू बयस, राजीक पहेलवान, सुभाष बुंदेले, रहेमानभाई व इतर अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.

अचलपूरच्या घटनेची पुनरावृत्ती टळली

अचलपूर शहरात कापड दुकनाला दोन महिन्यांपूर्वी आग लागून गोठवाल यांच्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. दर्यापुरातही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. जिथे आग लागली त्या दुकानाला लागूनच शिवप्रकाश पनपालिया यांचे पूजा ड्रेसेस आहे व दुसर्‍या मजल्यावर त्यांचे निवासस्थान आहे. ते आपली पत्नी शांता पनपालिया, मुलगी पूजा व मुलगा आनंद यांच्यासोबत घरातच होते. आगीने रौद्ररुप धारण केले. धूर दिसताच मॉर्निंग वॉकसाठी जाणारे शिक्षक विल्हेकर यांनी पनपालिया यांना फोन करून या घटनेची माहिती दिली व लगेच पनपालिया यांनी घरातील पाणी आगीच्या दिशेने भिरकावले. नंतर पनपालिया कुटुंबाला राजू बुंदेले यांनी सुखरूप बाहेर काढले.