शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांच्या पूर्वसूचनेविना उघडले बेंबळा प्रकल्पाचे गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:20 IST

बेंबळा प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १२ जुलैच्या मध्यरात्री सुरक्षिततेचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे काही गेट उघडण्यात आलेत. मात्र, याची पूर्वसूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आलेली नाही.

- गजानन मोहोड

अमरावती : बेंबळा प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १२ जुलैच्या मध्यरात्री सुरक्षिततेचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे काही गेट उघडण्यात आलेत. मात्र, याची पूर्वसूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आलेली नाही. ही गंभीर व बेजबाबदारपणाची बाब असल्याने संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्याची बाब विभागीय आयुक्तांनी गंभीरतेने घेतली. याविषयी आता जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता चौकशी करून शासनाला अहवाल देणार आहेत. मागील आठवड्यात ११ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस व बेंबळा प्रकल्पाचे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. प्रकल्पातील जलसाठ्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने यवतमाळ सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता व नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यलय किंवा जिल्हा मध्यवर्ती नियंत्रण कक्षास कोणतीही पूर्वसूचना न देता बेंबळा प्रकल्पाची १० गेट १२ जुलैच्या मध्यरात्री उघडली. यामुळे नदीपात्र अचानक दुथडी भरून वाहू लागले. सुदैवाने कोणतीही जिवित व वित्त हानी झाली नसली तरी यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात न आल्यामुळे नागरिक बेसावध होते. ही बाब यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी गंभीरतेने घेतली. अधीक्षक अभियंतासह यवतमाळ सिंचन मंडळाचे अधिकारी व कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच जिल्हाधिका-यांनी संबंधिताना १३ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिका-यांना विचारणा केल्यानंतर बेंबळा प्रकल्पाची १० गेट उघडण्यात आल्याची बाब उघडकीस आली. ही बाब अंत्यत गंभीर असून, संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच नदीकाठच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर चौकशी करणार आहेत.

अधीक्षक अभियंत्यांना माहीत होती बाबजिल्हाधिकारी राजेश देशमुख हे ११ जुलै रोजी स्वत: जिल्हा मध्यवर्ती नियंत्रण कक्षात उपस्थित होते. अधीक्षक अभियंता यांना बेंबळा प्रकल्पाची १० गेट उघडल्याची बाब माहीत असतानासुद्धा त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षास याची कल्पना दिली नाही. १२ जुलै रोजी जिल्हाधिका-यांनी विचारणा केली केली असता त्यांनी प्रकल्पाची गेट उघडल्याचे मान्य केले. यावरून अधीक्षक अभियंता व त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचा-यांनी कामात हयगय केल्याची बाब स्पष्ट झाली.

जिल्हाधिका-यांशी यासंदर्भात संवाद झाला. ११ जुलै रोजी बेंबळा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १० गेट उघडण्यात आली. रात्रीच्या सुमारास धरणाची गेट उघडत नाहीत. याविषयीची सूचना जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात आलेली नव्हती. मात्र, याबाबत हूटर (सायरण) वाजविण्यात आला होता. कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.- रवींद्र लांडेकर,मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती