आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : मकरसंक्रांतीचा स्वयंपाक करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी तालुक्यातील पेठरघुनाथपूर येथे घडली. यात तीन घरे जळाली. मात्र, सुदैवाने जीवहानी टळली.पेठरघुनाथपूर येथे पुरुषोत्तम आनंद खंडाते यांच्या घरी रविवारी त्यांच्या पत्नी स्वयंपाक करीत होत्या. दरम्यान त्या मुलीला जेवणासाठी बोलाविण्याकरिता बाहेर आल्या. याच दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी घरी कुणीच नव्हते. सिलिंडरचा स्फोट एवढा भीषण होता की, घरावरील टीनपत्रे. ४० फूट अंतरावर जाऊन पडले. आगीने घराला कवेत घेतले. यासोबतच त्यांच्या बाजूला वास्तव्यास असलेल्या दोन आदिवासी कुटुंबांच्या घरांनाही कवेत घेतले.आगीत पुरुषोत्तम खंडाते यांच्या घरातील संपूर्ण धान्य, कपडे जळून खाक झाले. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, खांब जळून खाक झाले. शेजारी असलेले हरिभाऊ सयाम, ज्ञानेश्वर सयाम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. माहिती मिळताच आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुरेश नीमकर, पंचायत समिती सदस्य संगीता नीमकर, सरपंच राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी या घराची पाहणी केली. धामणगाव डेमोस्टिक गॅसचे संचालक अशोक भंसाली यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तलाठी ठाकरे हे नुकसानग्रस्तचा अहवाल तयार करून तालुका प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पेठरघुनाथपूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:10 IST
मकरसंक्रांतीचा स्वयंपाक करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी तालुक्यातील पेठरघुनाथपूर येथे घडली. यात तीन घरे जळाली. मात्र, सुदैवाने जीवहानी टळली.
पेठरघुनाथपूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट
ठळक मुद्देतीन घरे जळून खाक : सुदैवाने जीवित हानी टळली