शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:17 IST

पाच वर्षात हुलकावणी दिलेल्या पावसाचे यंदा वेळेवर होणारे आगमन बळीराजाला सुखावणारे ठरले. रोहिणीपाठोपाठ मृगातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला.

ठळक मुद्देपेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा : पाच वर्षांत पहिल्यांदाच वेळेवर कोसळल्या मृगधारा

सूरज दहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पाच वर्षात हुलकावणी दिलेल्या पावसाचे यंदा वेळेवर होणारे आगमन बळीराजाला सुखावणारे ठरले. रोहिणीपाठोपाठ मृगातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला. तथापि, जिल्ह्यात २१ जूनपर्यंत तरी मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नाही. गतवर्षी भाकितांनीच वाट लावल्यामुळे प्रत्यक्ष दमदार पाऊस होईस्तोवर पेरणी करणे धाडसाचे ठरेल, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.मागील शुक्रवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. मृगसरी बरसायला लागल्या. मात्र, हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. परंपरेप्रमाणे जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची या पावसामुळे लगबग वाढली आहे. उन्हाळ्यात नांगरणीनंतर उखरलेल्या जमिनीद्वारे किडींचे कोष बाहेर येऊन उन्हाने नष्ट होतात व बुरशीचाही नायनाट होतो. मात्र, या जमिनीची मशागत करण्यासाठी मान्सूनपूर्व पावसाची आवश्यकता असते.यंदा मात्र रोहिणीमध्ये पाऊस झाल्यानंतर मृगातदेखील धो-धो पाऊस कोसळल्याने पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. शेताची वखरणी, काडीकचरा वेचणे, पेटवीणे आदी कामे सगळीकडे सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा बोंडअळीचा उपद्रव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २० मेपर्यंत बीटी कपाशीच्या बियाण्यास विक्री बंद होती. त्यामुळे बागायती कपाशीच्या पेरणीदेखील यंदा झालेली नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात पेरणीची सुरूवात होणार आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे धाडसाचे ठरणार आहे.२१ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यतामान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत असले तरी २१ जूननंतर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा खंड राहणार असल्याची शक्यता खरी ठरली आहे. तापमानही बरेच वाढले आहे. त्यामुळे सध्या पेरणी केल्यास ती उलटण्याची भीती आहे. हवामानतज्ञांच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत कमी दाबाचा पट्टा किंवा चक्राकार वारे नसल्यामुळे १८ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होऊन तापमानवाढीची शक्यता आहे.