शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुरुमाऐवजी कन्या शाळेत कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:59 IST

नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांतील कचरा शहरातील कन्या शाळेच्या प्रांगणात टाकला जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा : नगरपालिकेचा अजब गजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांतील कचरा शहरातील कन्या शाळेच्या प्रांगणात टाकला जात आहे.नगरपालिकेच्या अखत्यारीतील शहरातील कन्या शाळेच्या आवारात गेल्या कित्येक वर्षांपासून एका हॉटेलमधील सांडपाणी येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. त्यामुळे कन्या शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, यासाठी नगरपालिकेला विविध संघटनांच्यावतीने निवेदने देण्यात आली. विशेष म्हणजे, या शाळेमध्ये शहरातील चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात व सायंकाळच्या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, चिमुकले हे या शाळेच्या पटांगणात फेरफटका मारण्यासाठी, खेळण्यासाठी येत असतात. मात्र नगरपालिकेने ज्या ठिकाणी मुरूम टाकावा, त्याठिकाणी शहरातील नाल्यांमध्ये तीन ते चार वर्षांपूर्वी साचलेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण जिल्हाभरात अस्वच्छतेमुळे रोगराईचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. डासांमुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया आदी आजारांनीही उसळी घेतली आहे. त्यामुळे नगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावून गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी मुरुमाची भरती टाकावी, जेणेकरून रोगराई ही पसरणार नाही, अशी मागणी दर्यापूरवासीयांनी केली आहे.कचरा कन्या शाळेच्या आवारात टाकण्यासाठी आरोग्य विभागामार्फत पत्र दिले नाही वा ठराव मंजूर झालेला नाही. मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत.- अनिल बागळे, नगरसेवकराहत्या वस्तीमध्ये कचरा टाकल्यामुळे विषाणूजन्य आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे हा कचरा शहराच्या बाहेर नेऊन टाकावा.- डॉ. गुंजन गुल्हानेशासकीय वैद्यकीय अधिकारीकन्या शाळेच्या पटांगणामध्ये सांडपाण्याने खड्डे पडले आहेत. तेथे ठिकाणी हा गाळ टाकण्यात येत आहे. यानंतर पुढील कार्यवाही होईल.- गीता वंजारीमुख्याधिकारी, नगरपालिका