शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवर गार्बेज अरेस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:27 IST

पावसाळ्यात कचरा व प्लास्टिकमुळे अंबानाला बुजून वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. याला पायबंद बसावा अन् नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाद्वारा यंदा लहान नाल्यांमधील कचरा व पाणी अंबा नाल्यात शिरण्यापूर्वीच तीन ठिकाणी लोखंडी कठड्यांद्वारे (गार्बेज अरेस्टर) अटकाव केला जाणार आहे.

ठळक मुद्देतीन ठिकाणी लोखंडी कठडे । पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरू नये यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यात कचरा व प्लास्टिकमुळे अंबानाला बुजून वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. याला पायबंद बसावा अन् नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाद्वारा यंदा लहान नाल्यांमधील कचरा व पाणी अंबा नाल्यात शिरण्यापूर्वीच तीन ठिकाणी लोखंडी कठड्यांद्वारे (गार्बेज अरेस्टर) अटकाव केला जाणार आहे. अंबानाला कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनाची मान्सनूपूर्व लगबग सुरू आहे.शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या अंबानाल्याला अनेक लहान नाले मिळतात. यापैकी प्रमुख तीन नाल्यांवर यंदा कचरा व प्लास्टिकचा अटकाव करण्यासाठी लोखंडी कठडे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये काँग्रेसनगर व फ्रेझरपुरादरम्यान एक गार्बेज अरेस्टर याच आठवड्यात लावले. नागपूर मार्गावरील तारासाहेब बगिच्याजवळ व चुनाभट्टी परिसरात असे तीन ठिकाणी नाल्यातील कचरा व प्लास्टिकला अटकाव केला जाईल. पुरामुळे तेथे कचरा अडकल्यानंतर दुसºया दिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारा तो काढला जाणार आहे. या लहान नाल्यांचे पाणी अंबानाल्यात पोहोचण्यापूर्वी कचरा निघणार असल्याने काठालगतच्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचा धोका टळणार असल्याची माहिती उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निधीतून ही कामे होत आहे. लोखंडी तीन गार्बेज अरेस्टरसाठी फारतर तीन, साडेतीन लाखांचा निधी खर्च होणार आहे. परंतु यामुळे कित्येक टन प्लास्टिकला अटकाव होऊन अंबानाला कचऱ्याने बुजून पूर येणे व नंतर काठालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरणे आदी संभाव्य धोका टळणार आहे. कचऱ्यामुळे नाल्यांचा प्रवाह थांबल्यास होणारी डासांची उत्पत्ती, घाण व त्यामुळे होणारी दर्गंधी यामुळे काही प्रमाणात कमी होणार आहे.तीनही वेगळ्या प्रकारचे गार्बेज अरेस्टरअंबानाल्यात पाणी शिरण्यापूर्वी लहान नाल्यांवर काँग्रेसनगर ते फ्रेझरपुऱ्याच्या मधात लोखंडी कठड्याचे गार्बेज अरेस्टर या आठवड्यात लावण्यात आले. नागपूर मार्गावरील तारासाहेब बगिच्याजवळील गार्बेज अरेस्टरला नाल्यात लोंखडी जाळी लावण्यात येणार आहे, तर चुनाभट्टी परिसरातील नाल्यावरील गार्बेज अरेस्टरला टेनिसची नेट लावण्यात येणार आहे. यामुळे लहान आकाराचा कचरा व प्लास्टिकला जागेवरच अटकाव होणार आहे.यंदा अंबानाल्याला मिळणाऱ्या तीन नाल्यांवर तीन ठिकाणी गार्बेज अरेस्टर बसविण्यात येत आहे. यामुळे अंबानाल्यात कचरा वाहून जाण्यापूर्वीच त्याला अटकाव होऊन संभाव्य धोके टळणार आहे.- सुहास चव्हाण,कार्यकारी अभियंता, महापालिका