शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावातून सलग दुसऱ्या दिवशी गांजा जप्त; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: February 22, 2024 13:29 IST

साडे तीन किलो गांजा बाळगताना एकाला अटक, गांजा तस्करी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील स्मशानभूमी परिसरातून अटक केली.  

अमरावती: अंजनगाव सुर्जी येथून सलग दुसऱ्या दिवशी ३ किलो ५०९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी ही संयुक्त कारवाई केली. गोपाल उत्तमराव फुसे (वय ३७ रा. माळीपुरा अंजनगाव सुर्जी) असे अटक गांजा तस्कराचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २१ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करीत असता अंजनगाव सुर्जी येथील गोपाल फुसे हा अवैधरित्या विक्रीसाठी गांजा घेवुन येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. प्राप्त माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंजनगाव सुर्जी ते आकोट रोडवरील कचरा डेपोसमोर सापळा रचला. सापळयादरम्यान, आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळील बॅगमध्ये ५२ हजार ५०० रुपयांचा गांजा, एक हजार रुपयांची बॅग व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द अंजनगाव सुर्जी पोलिसांत एनडीपीएस कायदयान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे, अंजनगाव सुर्जी येथील ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरिक्षक संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, दिनेश कनोजिया, सागर धापड, रितेश वानखडे, चालक संजय गेठे, जयसिंग चव्हाण, शुभम मार्कंड यांनी केली.

मंगळवारी देखील केली कारवाईगांजा तस्करी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील स्मशानभूमी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ३ किलो ८६८ ग्रॅम गांजा व अन्य साहित्य असा एकूण ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संतोष साहेबराव गुंजावाळे (२९, रा. वानखडे पेठ, अंजनगाव सुर्जी) असे अटक तस्कराचे नाव आहे. संतोष गुंजावाळे हा विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा घेऊन अंजनगाव सुर्जीला येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.