शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

आश्रमात 'गँगवॉर'?

By admin | Updated: August 12, 2016 00:07 IST

प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याच्या गळ्यावर असलेल्या जखमांचे स्वरुप आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी त्या अनुषंगाने नोंदविलेला निष्कर्ष ...

नाना शक्यता : चौफेर व्हावा पोलीस तपास अमरावती : प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याच्या गळ्यावर असलेल्या जखमांचे स्वरुप आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी त्या अनुषंगाने नोंदविलेला निष्कर्ष विचारात घेता आश्रम परिसरात 'गँग' तर अस्तित्वात नाहीत ना, या दिशेनेही तपास केला जाणे आवश्यक आहे. ११ वर्षीय प्रथमेशच्या गळ्यावर जे वार झालेत ते अनंत शंकांना जन्म देणारे आहेत. विषय चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, त्यांच्या भवितव्याशी आणि विश्वशांतीचा प्रसार करणाऱ्या आश्रमाच्या प्रतिमेशी जुळलेला असल्याने या मुद्याचा उहापोह होणे गरजेचे आहे. प्रथमेशने स्वत:च स्वत:वर वार करवून घेतले असावे, असा एक आश्चर्यकारक प्रसार पिंपळखुट्यातून केला गेला. तज्ज्ञांच्या मते तीनही वार दुसऱ्याने केलेले आहेत. ते धारदार शस्त्राचे आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या या अधिकृत मताशिवायदेखील काही मुद्यांवर विचार केला जाऊ शकतो. तीनही वार खोल आहेत. प्रथमेशने आत्मघातासाठी स्वत: ते केले असते तर त्वेषाने केलेला पहिला वार खोल असता. दुसऱ्यांदा त्याची हिम्मत खचली असती. तो कमी खोल असता. तिसरा आणखी उथळ असता. खरे तर चिमुकल्या मुलाने स्वत:वर तीन वार करणेच मुळी अशक्य आहे. तरीही, वार केल्याचे गृहित धरल्यास, आत्मघाताचा निश्चय पक्का केलेली व्यक्ती मृत्यूच्या प्रतीक्षेत निपचित पडली असती. प्रथमेश मात्र वरच्या माळ्यावरून जिवाच्या आकांताने ओरडत खाली पळत सुटला. खाली धावत येत असतानाच रक्तबंबाळ अवस्थेत तो कोसळला. गळ्याची मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्यानंतर झालेल्या अनियंत्रित भरमसाठ रक्तस्त्रावामुळे तो बेशुद्ध झाला. प्रथमेश आत्मघात करणार असता तर तो जीव मुठीत घेऊन का पळत सुटला असता? आई-वडील सांगतात, प्रथमेश गुणी आहे. सुस्वभावी आहे. संयमी आहे. यंदाच त्याचा प्रवेश आश्रमातील वसतिगृहात करण्यात आला होता. आई-वडिलांपासून लांब राहण्याचा त्याला सरावही झालेला नव्हता. घरी जाण्याची कमालीची ओढ त्याच्या मनी असायची. जन्मदात्यांच्या प्रेमाच्या गडद छायेतून अद्यापही बाहेर न आलेल्या चिमुकल्या प्रथमेशचा मृत्युशी परिचयदेखील झालेला नव्हता. आत्मघात आणि त्याच्या अनेक तऱ्हांशी मग त्याचा कसा संबंध? प्रथमेशने आत्मघात केला नसल्याचे या तमाम मुद्यांवरून स्पष्ट होते. याचाच अर्थ असा की, कुणी दुसऱ्याने प्रथमेशवर वार केले. प्रथमेशच्या गळ्यावर झालेले वार गंभीर आहेत. -अखेर बजावली नोटीस दोघांचे बयाणही नोंदविले चौकशी पथक गठित : 'लोकमत'च्या वृत्तांमधील मुद्यांचा समावेश 'लोकमत'मध्ये गुरुवारी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी अखेर वसतिगृहाचे अधीक्षक दिलीप मौजे, वसतिगृह समितीचे प्रमुख बबनराव जवंजाळ आणि श्री संत शंकर महाराज आश्रमाचे सचिव राजेंद्र लुंगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. शंकरबाबा आश्रमात घडलेल्या गुन्हेगारी प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी द्विसदस्यीय विशेष चौकशी पथक स्थापित केले. गुरुवारी पिंपळखुट्याच्या आश्रमात हे पथक धडकले. 'लोकमत'ने उपस्थित केलेल्या मुद्यांच्या आधारे दिलीप मौजे, बबनराव जवंजाळ यांचे बयाण या पथकाने नोंदविले. राजेंद्र लुंगे यांच्या नावे जारी झालेली नोटीस संस्थेच्या कोषाध्यक्षांनी स्वीकारली. कारणे दाखवा नोटीशीत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न ‘लोकमत’च्या वृत्तावर आधारित होते. नाश्ता केल्यानंतर प्रथमेश बाहेर गेला कसा? तो बाहेर गेला त्यावेळी त्याच्यासोबत कुणी होते काय? असेल तर कोण होते?