शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पोलिसांची हप्तेखोरीने गँगवॉर, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:52 IST

गांजा, दारू, गुटखा, वरली मटका, चोऱ्या, हाणामारी, लुटपाट, दरोडे, हत्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा बुधवारचा प्रकार शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. अलीकडच्या घटनांवरून येथे आता गँगवार जन्म घेत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

ठळक मुद्देबारूदच्या ढिगारावर जुळे शहर : तरुणांमध्ये गांजा, दारूचे वाढले प्रमाण; वर्चस्वाची लढाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गांजा, दारू, गुटखा, वरली मटका, चोऱ्या, हाणामारी, लुटपाट, दरोडे, हत्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा बुधवारचा प्रकार शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. अलीकडच्या घटनांवरून येथे आता गँगवार जन्म घेत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.परतवाडा, अचलपूर शहरातील युवक मोठ्या प्रमाणात गांजा, दारूच्या आहारी गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने पूर्वीच प्रकाशित केले. शहरात खाकी वर्दीचा धाक नसल्याचे चित्र दररोजचे आहे. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांच्या यादीत दिवसागणिक भर पडत आहे. ज्या प्रकरणाशी कुणाचा काही संबंध नाही, त्यावरून सर्वसामान्य नागरिक व व्यापाºयांना वेठीस धरून दहशत पसरवून आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचे हे प्रयत्न असल्याचे पुढे आले आहे.गँगवॉर तयार करण्याचा प्रयत्नअचलपूर शहरात बारूद व परतवाडा शहरात लल्ला नामक गँग आहेत. पोलिसांना त्याची माहिती आहे. या गँगमधील सदस्य गांजा व दारूच्या आहारी गेले असून, अवैध धंदे, चोरी, हाणामारीतून दहशत पसरविणे त्यांचे कार्य आहे. मंगळवारी रात्री ९.३० वाजता दीपक ऊर्फ झांशी कुंबलेले याने त्याचा एकेकाळचा जीवलग मित्र सल्लू ऊर्फ सलमानची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याच्यासोबत लल्ला ठाकूर व पवन नामक युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक ऊर्फ झांशी याने परतवाडा ठाण्यात जाऊन स्वत: आत्मसमर्पण केले, तर दोघे अजूनही पसार आहेत. बुधवारी या घटनेशी तीळमात्र संबंध नसलेल्या व्यापाºयांच्या प्रतिष्ठानांवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी दगडफेक, चाकुहल्ला केला. त्यात पप्पू मिर्झा, अजहर, जुबेर शाह, मोहसीन, शब्बीर, इरफान, इमू बाबाभाई, सोहेल, चांदभाई, सोनू, कजिरोद्दीन, मोनू इमरान बिल्डर, फिक इब्राहिमसह इतर ६० ते ७० हल्लेखोरांविरुद्ध दरोडा, हत्येचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व लोकांना घेऊन टोळीप्रमुख आपली वेगळी गँग बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आला असताना परतवाडा ठाणेदार किंवा पोलिसांचा वचक शहरावर नसल्याचे चित्र आहे. ठाणेदारांवर निष्क्रियतेचा ठपका जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; मास्टर माइंड कोण?दुकानांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि व्यापारी या दोघांचाही संबंध मंगळवारीचा मृत युवक व खून करणाºया आरोपींसोबत नाही. असे असताना मोठा जमाव करून व्यापाºयांवर प्राणघातक हल्ला व दरोडा टाकत सामानाची नासधूस करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा म्होरक्या कोण, याचा शोध पोलिसांना घेणे गरजेचे ठरले आहे. ४० ते ५० च्या संख्येने असलेल्या हल्लेखोरांनी कट रचून दगडफेक, लुटपाट, चाकुहल्ला केल्याचे स्पष्ट होते. या परिसरातील व्यापाºयांमध्ये खळबळ माजवून दहशत पसरविण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सत्ताधाऱ्यांनी तात्काळ मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना दिला. मंगळवारी झालेल्या हत्येच्या घटनेशी तीळमात्र संबंध नसताना बुधवारी करण्यात आलेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज शहरात व्हायरल झाल्याने ठिकठिकाणी त्याची चर्चा सुरू आहेपाच आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडीव्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व चाकुहल्ला करणाऱ्या ४० ते ५० हल्लेखोरांपैकी पाच जणांना परतवाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली मोहम्मद अजहर मोहम्मद इकबाल (३२), गोलू (२६, रा. छोटा बाजार), शोएब शब्बीर (२५), फईन खान मोहम्मद (२८, अन्सारनगर) व मोहम्मद परवेज मोहम्मद आसिफ (गरीब नवाज कॉलनी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी अचलपूर न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.