शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आठ फुटांपेक्षा मोठी नसावी गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:07 IST

आगामी गणोशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, गणेशमूर्ती स्थापनेसंबंधी पोलीस ठाणेनिहाय बैठकी सुरू आहेत. या बैठकीत विविध सूचनांच्या अनुंषगाने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा आठ फूट निश्चित करण्यात आली असून, ती मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसची नसावी, अशी सक्त सूचना गणेश मंडळांना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्लास्टर आॅफ पॅरिसवर निर्बंध : गणेश मंडळांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी गणोशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, गणेशमूर्ती स्थापनेसंबंधी पोलीस ठाणेनिहाय बैठकी सुरू आहेत. या बैठकीत विविध सूचनांच्या अनुंषगाने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा आठ फूट निश्चित करण्यात आली असून, ती मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसची नसावी, अशी सक्त सूचना गणेश मंडळांना देण्यात आली आहे.१३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, महिन्याभरापूर्वी अमरावतीकर तयारीला लागले आहेत. दरवर्षीच अमरावती शहरात गणेश स्थापनेचा उत्साह असतो. यंदाही तोच उत्साह कायम राहण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, महापालिका, बीअँडसी अधिकाऱ्यांकडून गणेश मंडळांना सूचना देण्यात येत आहेत. त्यामध्ये पोलीस विभागाने गणेश स्थापनेच्या मंडपासंदर्भात काही अटींचे पालन करण्याच्या सूचना मंडळांना दिल्या आहेत.ध्वनिप्रदूषणावर मर्यादागणेश स्थापना व विसर्जन कार्यक्रमात विनापरवाना वाद्य वाजविता येणार नाही. डीजे साऊंड वाजवू नये तसेच स्पिकरची भिंत लावू नये. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर बंद ठेवावे. हवेत गुलाल फेकू नये, धार्र्मिक भावना दुखेल असे कृत्य करू नये. ध्वनिमर्यादा पाळावी. शांतता झोनमध्ये ५० डेसिबल, निवासी झोनमध्ये ५५ डेसिबल, वाणिज्य झोनमध्ये ६५ डेसिबल व औद्योगिक झोनमध्ये ७५ डेसिबलची मर्यादा आहे.अटीचे उल्लंघन केल्यास कारवाईगणेश मंडळांकडून अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण सरंक्षण कायदा १९८६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबधीत व्यक्तीस पाच वर्षे तुरुगांवास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षेची तरतूद आहे. मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.अशा आहेत अटीलहान रोडवर मंडप येत असल्यास २५ टक्के जागा घेता येईल.रहदारीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.उत्सव संपल्यानंतर मंडप काढून जागा पूर्ववत करा.जागेवर स्थायी बांधकाम करता येणार नाही.स्वागत द्वार, झिलेटिन मंडपाची उंची १५ फुटांपेक्षा कमी नसावी.मंडपाचे बांधकाम जबाबदार व्यक्तीकडूनच करून घ्यावे.इलेक्ट्रीक वाहिनीखाली मंडप घेऊ नये. महावितरणकडून तपासणी करून घ्यावी.मंडपात रात्री चार स्वयंसेवक व दिवसा दोन नियमित ठेवावे.मिरवणुकीतील वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक.मूर्ती प्लास्टर आॅफ परिसची नसावी. उंची आठ फुटांपेक्षा अधिक नसावी.स्वयंसेवक टाइमपास म्हणून जुगार खेळणार नाहीत.