शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘ओडीएफ’साठी गांधी जयंतीची डेडलाईन !

By admin | Updated: May 8, 2017 00:05 IST

तब्बल १२ हजार वैयक्तिक शौचालयांची उभारणी करणाऱ्या महापालिकेबाबत राज्यस्तरीय तपासणी पथकाने निगेटिव्ह मार्किंग केले आहे.

आयुक्तांकडून आढावा : पथकाचे निगेटिव्ह मार्किंग, आज मुंबईत बैठक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तब्बल १२ हजार वैयक्तिक शौचालयांची उभारणी करणाऱ्या महापालिकेबाबत राज्यस्तरीय तपासणी पथकाने निगेटिव्ह मार्किंग केले आहे. या अनुषंगाने रविवारी आयुक्त हेमंत पवार यांनी हागणदारीमुक्त शहराचा (ओडीएफ) संपूर्ण आढावा घेतला तथा वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांसह सहआयुक्तांना योग्य ते दिशानिर्देश दिलेत.नगरविकास विभागाने महापालिकांना ओडीएफसाठी अंतिमत: २ आॅक्टोबर ही डेडलाईन दिली असली तरी त्यापूर्वीच उद्भवलेल्या समस्यांचा आढावा घेऊन शहर ओडीएफ करण्यासाठी महापालिका सज्ज असेल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. दरम्यान सोमवार ८ मे रोजी स्वच्छता अभियानासंदर्भात मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक होणार असून याबैठकीला आयुक्त हेमंत पवार आणि वैद्यकीय अधिकारी अजय जाधव सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आयुक्त पवार आणि महापौर संजय नरवणे यांनी ३१ मार्चला घोषित केलेल्या हागणदारीमुक्त शहराच्या दाव्याची तपासणी करण्याकरिता २ ते ४ मे दरम्यान पाच सदस्यीय समिती शहरात दाखल झाली होती. मुख्याधिकारी संवर्गाचे अधिकारी सुधीर शंभरकर यांच्या नेतृत्वातील यापथकाने २ ते ४ मे दरम्यान शहरातील वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांसह अन्य ठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी केली. मात्र, पहिल्याच दिवसापासून महापालिका प्रशासनावर या पथकाची अनामिक दहशतही अनुभवायला मिळाली. राज्यस्तरीय तपासणी पथकाशी महापालिका यंत्रणेने ‘समन्वय’ साधला नाही, अशी काही समिती सदस्यांची ओरड होती. त्यातच यापथकावरील तीन सदस्यांचा खर्च उचलायचा कुणी, हा प्रश्नही निर्माण झाला होता. उपसचिवांचे उपाययोजनांचे निर्देशअमरावती : सरतेशेवटी पथकातील ३ सदस्यांनी स्वखर्चाने विश्रामगृहातील निवास व भोजन व्यवस्थेची देयके दिली. यापार्श्वभूमिवर पथकाचा दौरा महापालिका वर्तुळात गाजला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे हे पथक निगेटिव्ह मार्किंगच करेल, अशी भीतीवजा पूर्वकल्पना महापालिकेतील उच्चाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली होती. ती पूर्वकल्पना खरी ठरली असून शंभरकर यांच्या नेतृत्वातील राज्यस्तरीय पथकाने महापालिकेच्या ‘ओडीएफ’च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. महापालिका यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्याला केलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मॅसेजवरुन पथकातील एका अधिकाऱ्याची कोती मानसिकता स्पष्ट झाली. त्याअनुषंगाने शासनाने उपसचिव सुधाकर बोबडे यांनी ५ मे रोजी आयुक्तांच्या नावे पत्र लिहून राज्यस्तरीय तपासणी पथकाचा अहवाल पाठविला आहे. राज्यस्तरीय समितीला आढळून आलेल्या बाबींच्या अनुषंगाने शहर विहित कालावधीत हागणदारीमुक्त होण्यासाठी खास त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना बोबडे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्याअनुषंगाने आयुक्तांनी एक पत्र काढून त्यानुसार प्राधान्याने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता, स्वास्थ्य निरीक्षकांना दिली आहे. त्यासाठी रविवारी सुटीच्या दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिशन ‘ओडीएफ’ पूर्णत्वास नेण्यासाठी निधी, समस्या व अन्य बाबींचा उहापोह केला.समितीचे आक्षेप उघड्यावरील शौचास जागा आढळून आल्यात. बऱ्यात प्रमाणात व्यक्ती उघड्यावर जाताना आढळलेत. सार्वजनिक शौचालयांची अपुरी सुविधा ओडी स्पॉटमध्ये दुर्गंधी निधीअभावी शौचालय बांधकाम अपूर्ण