शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘ती’च्या गणपतीचे दिमाखदार स्वागत!

By admin | Updated: September 19, 2015 00:18 IST

कुटुंबाचा आणि समाजाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ‘ती’. सृष्टीच्या निर्मितीचे श्रेयही तिच्याच पदरात. मग, विघ्नहर्त्याच्या अग्रपूजेचा पहिला मान तिला का मिळू नये?

संपूर्ण पुढाकार महिलांचाच : ‘लोकमत’चे अभिनव आयोजनअमरावती : कुटुंबाचा आणि समाजाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ‘ती’. सृष्टीच्या निर्मितीचे श्रेयही तिच्याच पदरात. मग, विघ्नहर्त्याच्या अग्रपूजेचा पहिला मान तिला का मिळू नये? ‘लोकमत’ने चुटकीसरशी या प्रश्नाचे उत्तरही शोधले अन् ‘ती’च्या नेतृत्त्वात रविवारी बाप्पा वाजत-गाजत, उत्साहाने विराजमान झाले. ‘लोकमत’ ने यंदाच्या गणेशोत्सवात कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘आपले बाप्पा’ या उपक्रमाची सुरूवात केली. लोकमत सखी मंचद्वारे स्थानिक ‘लोकमत’ कार्यालयात महिलांच्या नेतृत्त्वात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सखीमंचच्या महिला सदस्य व लोेकमत परिवाराच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात विधिवत श्रीगणेशाची स्थापना केली. श्रींच्या आगमनाच्या निमित्ताने कार्यालयात सुरेख सजावट करण्यात आलीे. रंगीबेरंगी पताकांनी सजविलेल्या मखरात मंत्रोच्चारांच्या गजरात बाप्पा विराजमान झालेत. या आगळ्या उपक्रमात लोकमततर्फे दहा दिवस महिलांनाच पुजेचा व नियोजनाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ‘ती’चा गणपती प्रतिष्ठापना सोहळ्यात लोकमत सखीमंचच्या सदस्य नलिनी थोरात, रिता मोकलकर, कुंदा वंजारी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बाप्पासोबत ‘सेल्फी’ पाठवायंदा लोकमतने ‘माझे बाप्पा, माझी सेल्फी’ हा आगळावेगळा उपक्रम देखील हाती घेतला आहे. या अंतर्गत नागरिकांनी बाप्पासोबत सेल्फी काढून ‘लोकमत’ कार्यालय, जिल्हा स्टेडियमनजीक, अमरावती या पत्त्यावर पाठवावीत. त्यांना ‘लोकमत’ मधून प्रसिध्दी दिली जाईल. नागरिकांनी त्यांच्या बाप्पासमवेतच्या सेल्फी ‘९६६५४९८१७० या व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकावर पाठवाव्या.‘लोकमत’ निर्माल्य संकलन अभियान यंदाच्या गणेशोत्सवाला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव करण्याच्या दृष्टीने लोकमतने एक पाऊल पुढे टाकले आहे. याच अनुषंगाने ‘लोकमत ुनिर्माल्य संकलन’ उपक्रम राबविला आहे. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निघालेले निर्माल्य हे ‘संकलन बॅग’ मध्येच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. देऊया ‘ती’ला मान‘लोकमत’च्यावतीने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या काळात एक दिवस ‘ती’ ला मान देण्याचे आवाहन केले आहे. यात महिलांना आरती-पूजा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले आहे.