शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील गणपती, कालभैरव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

By admin | Updated: August 31, 2014 23:28 IST

एकवीरा देवीचा दाह शांतीकरिता रविवारी सकाळी मंदिरामध्ये होमहवनातून पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. पंढरपूर येथून मागविलेल्या गणपती व कालभैरवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अमरावती : एकवीरा देवीचा दाह शांतीकरिता रविवारी सकाळी मंदिरामध्ये होमहवनातून पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. पंढरपूर येथून मागविलेल्या गणपती व कालभैरवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नवरात्रीपूर्वी एकवीरा देवीला दागिन्यांचा श्रुंगार चढविण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्यावतीने देण्यात आली.एकवीरा देवीच्या मूर्तीवरील शेंदुराची खोळ पडल्यामुळे एकवीरा देवीच्या मूळ मूर्तीचे पहिल्यांदाच दर्शन घडले. ही घटना अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक मानली जात आहे. त्यामुळे भक्तांमध्ये एकवीरा देवीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. तसेच भाविकांच्या भावनांचा विचार करुन विश्वस्त मंडळामध्ये उत्साह दिसून येत आहे. एकवीरा देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घडल्याने रविवारी सकाळी यथायोग्य पूजाअर्चना, अभिषेक, होमहवन करण्यात आले. नागपूर येथील पंडित श्रीकृष्णशास्त्री आर्वीकर यांच्या हस्ते पूजाअर्चना करण्यात आली. दुपारी १ वाजता आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. आता विश्वस्त पुढील तयारीला लागले असून नवरात्री पूर्वी मूर्तीला चांदीचा मुखवटा व त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात येणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असल्याने तेथील सुख-सुविधांकडे संस्थानचे चंद्रशेखर भोंदू, दीपक सब्जीवाले, शेखर कुळकर्णी, शैलेश वानखडे, परीक्षित गणोरकर, राजेंद्र गणोरकर लक्ष ठेवून आहेत.