शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लिम अंत्ययात्रेला रस्ता; अमरावतीकरांनी दिले एकतेचे दर्शन

By प्रदीप भाकरे | Updated: September 10, 2022 15:57 IST

पोलिसांनी झेंडा चौक येथील गणपती मंडळाची सुद्धा संपर्क करून समन्वयक घालण्याचा प्रयत्न केला.

अचलपूर, अमरावती : संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमदृष्टीने अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या अचलपूर शहरात जवळपास दोन हजार लोकांच्या सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीतून मुस्लिम अंतयात्रेला रस्ता देण्यात आला. तसेच अंत्ययात्रे दरम्यान मिरवणुकीतील सर्व वाद्ययंत्रे, लेझीम बंद करून रस्त्याच्या दुतारफा उभे राहून हिंदू मुस्लिम एकतेचे उदाहरण दिले. हिंदू मुस्लिम कोमी एकतेचे उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या अचलपुरातील झेंडा चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यामध्ये समन्वयक घडविणाऱ्या अचलपूर पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

शुक्रवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी बिलानपुरा अचलपूर येथील एका प्रतिष्ठित मुस्लिम पुरुषाचा मृत्यू झाला त्याच दिवशी हिंदूंचा गणपती सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचा दिवस आपण अंत्ययात्रा कशी काढावी हा यक्षप्रश्न मुस्लिम मयत घरातील नागरिकांना पडला. घरच्या नागरिकांनी याबाबत अचलपूर पोलिसांची संपर्क केला पोलिसांनी तात्काळ मयत झालेल्या नागरिकांचे घर गाठून नातेवाईक काशी ाबाबत चर्चा केली तसेच अंतयात्रेला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली. 

याबाबत पोलिसांनी झेंडा चौक येथील गणपती मंडळाची सुद्धा संपर्क करून समन्वयक घालण्याचा प्रयत्न केला. अचलपुरातील झेंडा चौक हे अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो याच भागातून सार्वजनिक गणपती मंडळाची मिरवणुकीची वेळ आणि हाच अंतयात्रा रस्ता मुस्लिम बांधवांना पोलिसांनी विश्वासात घेऊन पूर्ण अंत्ययात्रेला पोलीस बंदोबस्त देण्याचा सांगितले त्यानुसार अंतयात्रा बिलनपुरा येथे संध्याकाळी आली व तेथेच जनाजे नमाज पडुन मुस्लिम कब्रस्तान कडे निघाले. अंत यात्रेच्या वेळेस झेंडा चौक येथील हनुमान व्यायाम मंडळ व नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक भर रंगात होती मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य यंत्रे ढोल ताशे लेझीम होते मुस्लिम अंतयात्रा सहभागी 400 500 नागरिक झेंडा चौक वर येतात गणपती मंडळांनी आपले सर्व वाद्ययंत्रे व लेझीम बंद करून सर्व नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूने मन उभे राहून मुस्लिम यात्रेला रस्ता करून दिला मुस्लिम अंतयात्रा पोलिसांनी खिडकी गेट पर्यंत सोडून दिलीया घटनेनंतर मुस्लिम अमन ग्रुपच्या वतीने गणपती मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम हिंदू समाजाचे समन्वयक साधण्याकरता अचलपूरचे ठाणेदार माधवराव गरुड डीबी स्कॉडचे पुरुषोत्तम बावनेर तसेच एलसीबी चे अधिकारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गणपती मंडळांनी केलेल्या या कार्याचे सर्व समाजात कौतुक होत आहे.मुस्लिम अंत्ययात्रेला हिंदू गणपती सार्वजनिक मंडळांनी आपली वाद्य यंत्रे बंद करून काैमी एकतेचा सुरेख संदेश दिला हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाला एकत्र आणण्याकरता अचलपूर पोलिसांनी समन्वय घडून आणला.- माधवराव गरुड, ठाणेदार, अचलपूर

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव