जितेंद्र फुटाणे।लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : मोर्शी तालुक्यातील हिवरखेड ते लोणी मार्गावर गणपतवाडीला लागूनच चिंचेचे भले मोठे झाड आहे. या चिंचेच्या झाडावर विराजमान गणपती बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. येथील भाविकांसाठी हा आस्थेचा विषय ठरला आहे.काही वर्षांपूर्वी चिंचेच्या झाडाखाली गणपतीची दगडी मुर्ती होती. शरद देवघरे यांनी तेथे मंदिर बांधून दिले. मात्र काही वर्षांनी चिंचेच्या झाडावरच गणपतीच्या आकाराची फांदी उगवली. एका मोठ्या फांदीची उपफांदी हुबेहुब गणपती बाप्पांच्या सोंडेसमान दिसत असल्याचे निरीक्षण गावातील आशिष आमले यांनी नोंदविले. या रस्त्यावरून ये-जा करताना आमले या गणपती बाप्पांविषयी विचार करत होते. त्या विचारातून गणपतीच्या सोेंडेसमान दिसणारी ती डहाळी रंगविण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यांनी फांदीचा तो भाग गणपती बाप्पांसारखा रंगवून घेतला. आता त्या झाडाजवळून ये-जा करणारा प्रत्येक जण तेथे नतमस्तक होतो. ज्या झाडाखाली जी मूर्ती असेल त्या झाडाला काही वर्षानी कुठे ना कुठे मूर्तीचा आकार येतो, अशी वदंता आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या भक्तांमध्ये मोठी वाढ झाली असून येथे गणेशोत्सव साजरा करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.
चिंचेच्या झाडावर गणपती बाप्पा विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST
काही वर्षांपूर्वी चिंचेच्या झाडाखाली गणपतीची दगडी मुर्ती होती. शरद देवघरे यांनी तेथे मंदिर बांधून दिले. मात्र काही वर्षांनी चिंचेच्या झाडावरच गणपतीच्या आकाराची फांदी उगवली. एका मोठ्या फांदीची उपफांदी हुबेहुब गणपती बाप्पांच्या सोंडेसमान दिसत असल्याचे निरीक्षण गावातील आशिष आमले यांनी नोंदविले. या रस्त्यावरून ये-जा करताना आमले या गणपती बाप्पांविषयी विचार करत होते.
चिंचेच्या झाडावर गणपती बाप्पा विराजमान
ठळक मुद्देफांदीवर रंगकाम । पंचक्रोशीतील गणेशभक्त नतमस्तक