शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरातील गाझी दर्गा वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: March 30, 2015 00:09 IST

येथील ऐतिहासिक दुल्हे रहमान शाह गाजी यांचा दर्गा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अचलपूर : येथील ऐतिहासिक दुल्हे रहमान शाह गाजी यांचा दर्गा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथे नियोजनबध्द व्यवस्थापन नसल्याने भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दर्ग्यावर सुयोग्य व्यवस्थापनाकरिता प्रशासक नियुक्त करावा यासाठी दीपक श्रीराम थोरात ऊर्फ मो. युसूफ यांनी प्रयत्न सुरु केले आहे. या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार मनोज लोणारकर यांना दिले. ही मागणी त्वरित पूर्ण न केल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.याबाबत थोरात यांनी तहसीलदारांना सादर निवेदनात म्हटले की, दुल्हे रहमान शाह गाझी यांच्या दर्गा परिसरात गांज्या ओढणारे टोळीने बसतात. त्यात काही नामांकित राजकीय व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. येथे येणाऱ्या इबादती लोकांच्या धार्मिक कार्यात व्यत्यय निर्माण होतो. येथे सफाई कामगार व चौकीदार नसल्याने भाविकांना अस्वच्छता व असुविधांचा सामना करावा लागतो. बिच्छन नदी दर्गा ट्रस्टच्या मालकीच्या जागेतून वाहते. ही नदी परतवाड्याकडून येत नसल्याने शहरातील घाण नदी परिसरापर्यंत येते. त्यामुळे दर्ग्याचे पावित्र्य भंग पावते. दर्गा ट्रस्ट नदी स्वच्छतेचे काम करण्यास असमर्थ आहे. तसेच आर्थिक नियोजन सुयोग्य पद्धतीने नसल्यामुळे आर्थिक नियोजनासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाही. दर्गा ट्रस्टने एका बिनपगारी चौकीदाराची नियुक्ती केली असून त्याने गांज्याच्या नशेत असताना मशिदीत नमाज पढत असलेल्या एका व्यक्तीला अपमानित केले. नमाजात बाधा आणली. दर्ग्यातील नमाज पढविणारे इमाम व सफाई कामगारांना पगार नाही. दर्गा ट्रस्टची शेती व जमिनीची ट्रस्ट सांभाळून ट्रस्टची आर्थिक स्थिती बळकट करण्यासंदर्भात ट्रस्ट उदासीन असून कोणतेही ठोस पावले उचलण्यास तयार नाही. या सर्व बाबींची शासनाने दखल घेऊन या दर्ग्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी अन्यथा उपोषणाचा इशारा मो. युसूफ यांनी दिला आहे.