शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबा पुण्यतिथी शोभायात्रेने दुमदुमली अंबानगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:38 IST

लोकोत्तर संत, कर्मयोगी गाडगेबाबा यांची जनमानसातील महती ठसठशीतपणे पुढे आली ती गुरुवारी सकाळी समाधी मंदिरातून निघालेल्या पुण्यतिथी शोभायात्रेने. बुधवारी रात्री १२.२० वाजता हजारोंनी मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा हा समुदाय एकत्र आला. प्रत्येकाच्या मुखातून ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हा उत्स्फूर्त घोष निघत होता.

ठळक मुद्देहजारो भाविक सहभागी : ’गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’चा घोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकोत्तर संत, कर्मयोगी गाडगेबाबा यांची जनमानसातील महती ठसठशीतपणे पुढे आली ती गुरुवारी सकाळी समाधी मंदिरातून निघालेल्या पुण्यतिथी शोभायात्रेने. बुधवारी रात्री १२.२० वाजता हजारोंनी मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा हा समुदाय एकत्र आला. प्रत्येकाच्या मुखातून ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हा उत्स्फूर्त घोष निघत होता.शोभायात्रेत हजारो आबालवृद्ध सहभागी झाले. संजीवनी कॉलनी, प्रेरणा कॉलनी, राधानगर मार्गे पुन्हा गाडगेनगर येथील समाधी मंदिरात शोभायात्रा पोहोचली. यादरम्यान नागरवाडी येथील संत गाडगेबाबा आश्रामशाळेचे विद्यार्थी प्रथेनुसार सहभागी झाले. पंचक्रोशीतील पालख्या व दिंड्या होत्या. संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्टचा स्वच्छता अभियान रथ होता. त्यांच्यासह विविध बँड पथके शोभायात्रेत होती. हनुमान भजन मंडळ (नरसिंगपूर), जय गुरुदेव सेवा मंडळ शिवण (बु.), शंभुशेख भजन (शिरजदा), श्रीकृष्ण भजन मंडळ (एंडली), ज्ञानेश्वर भजन मंडळ (कुकसा), गाडगेबाबा भजन (आमला), गाडगेबाबा मंडळ (पिंगळा), महर्षी वाल्मीकी भजन मंडळ (खालकोनी), शारदा उत्सव मंडळ (खोलापूर), गजानन महाराज भजन मंडळ (शिवण), गजानन महाराज भजन मंडळ (खैरी), गजानन महाराज भजन मंडळ (रावळगाव), दुर्गादेवी भजन मंडळ (पुंड), वारकरी भजन मंडळ (रोहणखेडा), रुक्मिणी महिला भजन मंडळ (रोहनखेडा) आदी दिंड्यांसह शाकंबरी प्रतिष्ठान (मूर्तिजापूर) यांच्याकडून टाळ-मृदंग, ढोल-ताशांचा निनाद व जल्लोष या ठिकाणी करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत देशमुख (रा. दादर), सागर देशमुख, भारत रेळे, डॉ. कावरे, मुख्यध्यापक किशोर चौधरी यांच्यासह हजारो भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. गाडगेबाबा समाधी मंदीर ट्रस्ट अमरावती, नागरवाडी येथील आश्रामशाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे आयोजनाकरिता सहकार्य लाभले.