शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील निवडक कर्मचाऱ्यांमुळे ‘जीएडी’ त्रस्त!

By admin | Updated: August 13, 2016 00:05 IST

महापालिकेतील निवडक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य प्रशासन विभाग ‘जीएडी’ त्रस्त झाली आहे.

उपायुक्तांचा लक्षवेध : हजेरी अहवालाला नकारअमरावती : महापालिकेतील निवडक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य प्रशासन विभाग ‘जीएडी’ त्रस्त झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या हजेरीपटावरून वेतनाची माहिती भरण्याचे महत्त्वपूर्ण काम जीएडीमध्ये केले जाते. त्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांकडून दरमहा हजेरी अहवाल मागविला जातो. मात्र काही कर्मचारी या प्रक्रियेला अपवाद ठरत असल्याने जीएडीसी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.अनेक कर्मचारी अर्जित, वैद्यकीय व किरकोळ रजेचा हिशेब जीएडीकडे देत नसल्याने त्यांचे महिन्याभराचे पूर्ण वेतन काढावे लागते. त्यामुळे महापालिकेला विनाकारण आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. काही कर्मचारी तर वैद्यकीय रजेवर असताना राजरोसपणे आयुक्त, उपायुक्तांचे दालन गाठून विशिष्ठ ठिकाणीच पदस्थापना द्यावी, अशी आर्जव करतात. एखादा कर्मचारी मेडीकलवर असताना तो रोज न चुकता महापालिकेत कसा येऊ शकतो, असा प्रश्न जीएडी कर्मचाऱ्यांना पडतो. विविध विभागांत लावलेले सदोष बायोमेट्रिक यंत्रे, महिन्याच्या सुरुवातीलाच पेमेंट सॉफ्टवेअरला लिंक न मिळणे, बायोमेट्रिक रिपोर्ट येत असताना ‘मॅन्युअल’ हजेरी अहवाल घेवून पगारपत्रके बनविणे, अशा विविध कसोट्यांवर सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांची कसरत सुरू आहे. जुन्या ठिकाणावरून ‘रिलिव्ह’ रिपोर्ट न आणता बदली झालेल्या ठिकाणावरून केवळ ज्वॉईनिंग रिपोर्टच्या आधारे मेडिकल लिव्ह मंजूर करण्याची, तशी नोंद घेण्याची गळ जीएडीतील कर्मचाऱ्यांना घातली जाते. (प्रतिनिधी)दरमहा हजेरी अहवालास ठेंगाआवश्यक त्या कागदपत्रांमध्ये दरमहा हजेरी अहवाल न मिळत असल्याने ६ मे रोजी कार्यालय अधीक्षकांनी पालिकेतील सर्व विभागप्रमुख तथा खातेप्रमुखांना पत्र पाठविले होते. दरमहा हजेरी अहवाल मिळत नसल्याने वेतनाची माहिती करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाला विलंब होतो. त्यामुळे दर महिन्याच्या एक तारखेला हजेरी अहवाल न चुकता पाठवावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र बहुतांश विभागप्रमुखांनी या पत्रानुसार अहवाल देणे सुरू केले आहे. मोजके खास कर्मचारी मात्र त्याला अपवाद आहेत. मोजके कर्मचारी जुमानेनादरमहा हजेरी अहवाल कसा पाठवावा, याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रपत्र तयार केले आहे. यात कर्मचाऱ्याचे नाव, कर्मचारी क्रमांक, अर्जित, मेडीकल, किरकोळ असा रजेचा प्रकार, गैरहजर असल्याचा कालावधी, शेरा समाविष्ठ केला आहे. मात्र विशिष्ठ कर्मचारी असा अहवाल न पाठवता सामान्य प्रशासन विभागाला जुमानत नसल्याची ओरड आहे.