लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आज करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी शनिवारी लोकमत आणि व्हीआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणून घेतला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळावा. ‘फ्युचर मंत्रा’ कार्यक्रमला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभियंता भवन येथे २३ डिसेंबर रोजी दु.१२.वा. वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून व्हीआयटीचे प्रोफेसर डॉ.अजयकुमार शर्मा आणि मोटीव्हेशन ट्रेनर विवेक मेहेत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुख वक्ते विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. दुसºया सत्रात व्हीआयटी युनिव्हर्सिटीचे डॉ.अजयकुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना चेन्नई, वेल्लूर, भोपाळ आणि आंध्र प्रदेश येथील व्हीआयटी युनिव्हर्सिटीबाबत सविस्तर माहिती दिली. अद्ययावत ज्ञान देण्याचा व्हीआयटीचा प्रयत्न असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भव्य कॅम्पस, सुसज्ज वर्गखोल्या, कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत संधी, याविषयी माहिती दिली. व्हीआयटीच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे आज अनेक परदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून, तुम्हीही उत्तम करिअर घडविण्यासाठी व्हीआयटीची मदत घ्या, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी नवोदय विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.एस. वाघमारे तसेच राजेश्वरी युनियन ज्युनिअर कॉलेज बडनेरा येथील विभागप्रमुख पांडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रम घेण्याचे सुचविले. कार्यकमाचे सूत्रसंचालन पोदार इंटरनॅशनलच्या शिक्षिका विजेता वानखडे यांनी केले.स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. यासाठी अगदी सुरुवातीपासूनच तुमचे ध्येय निश्चित करा. तुमच्या आवडी-निवडी जाणून घ्या.कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी, जिंकण्यासाठी जिद्द ठेवा आणि स्वत:वर विश्वास ठेवा.आत्मविश्वास बाळगा. अतिआत्मविश्वास नको. कारण यामुळे अनेक धोके तुम्ही स्वत:च तुमच्यापुढे वाढवून ठेवाल, अशा शब्दांत विवेक मेहेत्रे यांनी मुलांना प्रेरणा दिली.
‘फ्यूचर मंत्रा’ने दिला विद्यार्थ्यांना आत्मविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:09 IST
आज करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी शनिवारी लोकमत आणि व्हीआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणून घेतला.
‘फ्यूचर मंत्रा’ने दिला विद्यार्थ्यांना आत्मविश्वास
ठळक मुद्देकरिअर मार्गदर्शन : लोकमत आणि व्हीआयटी युनिव्हर्सिटी आयोजित उपक्रमाला प्रतिसाद