शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनभरी’च्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी

By admin | Updated: April 19, 2017 00:02 IST

‘मनभरी’च्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली.

अमरावती : ‘मनभरी’च्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली. त्याअनुषंगाने शहरात कालबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दस्तुरनगर मार्गावरील पूजा कॉलनीतील रहिवासी अमित विकासपंत सहारकर (३३) हे सोमवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कंवरनगरातील मनभरी प्रतिष्ठानात गेले होते. कंपनीविरुद्ध कारवाईची मागणीअमरावती : त्यांनी मनभरीच्या ‘सुपर व्हाईट सँडविच ब्रेड’चे एक पाकिट खरेदी केले. ते त्यांनी घरी नेऊन उघडले असता आतील ब्रेड बुरशीने बरबटलेली आढळून आली. त्यांनी ब्रेडच्या पाकिटाचे निरीक्षण केले असता ‘ब्रेड’ कालबाह्य झाल्याचे दिसून आले. ‘मनभरी’च्या उत्पादकांनी कालबाह्य ब्रेडची विक्री करून फसवणूक केल्याचे सहारकरांच्या लक्षात येताच याबाबत तक्रार करण्याकरिता त्यांनी थेट अन्न व औषधी प्रशासन कार्यालय गाठले. मनभरी उत्पादकांनी कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सहारकर यांनी तक्रारीतून केली आहे. मनभरी चिवड्यात आढळली होती तळलेली पालकाही महिन्यांपूर्वी चक्रधर नगरातील एका महिलेने ‘मनभरी’चे चिवडा पाकीट खरेदी केले होते. या पाकिटात चक्क तळलेली पाल आढळली होती. त्यामुळे महिलेला उलट्यांचा त्राससुद्धा झाला होता. तक्रारीनंतर एफडीएमार्फत चौकशी करण्यात आली. त्यावेळी ‘मनभरी’ च्या कारख्यान्यात काही त्रुटीसुद्धा आढळून आल्या होत्या. मनभरीच्या चिवड्याचे प्रकरण अद्यापही एफडीएच्या कोर्टात सुरु आहे. असे असताना पुन्हा एकदा ‘मनभरी’ उत्पादनांबद्दलचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.