शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ‘मनरेगा’अंतर्गत निधी प्राप्त; मजुरांना तत्काळ वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबविली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकासकामांना चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: कोरोनाकाळात मेळघाटात मोठ्या प्रमाणावर कामे राबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘मनरेगा’अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना वेळेत वेतन न मिळाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हा निधी तातडीने उपलब्ध होऊन वेतनाचे वाटपही सुरू झाले आहे. मनरेगाच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर असून, मोठी रोजगारनिर्मिती व विकासकामेही त्याद्वारे होत आहेत. त्यामुळे मजूर बांधवांना वेतन आदी प्रक्रिया नियमित व्हावी, यासाठी प्रशासनाने सजग राहून कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबविली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकासकामांना चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: कोरोनाकाळात मेळघाटात मोठ्या प्रमाणावर कामे राबविण्यात आली. त्यामुळे मोठी रोजगारनिर्मिती होऊन अमरावती जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया व्यापक करतानाच निधीही वेळोवेळी प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. मनरेगाअंतर्गत निधी प्राप्त होऊन मजुरांच्या खात्यात वेतन जमा होऊ लागली आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली. त्यातून जलसंधारण, इमारत बांधकाम, रस्तेदुरुस्ती अशी अनेक कामे अमरावती जिल्ह्यात अधिक होत आहेत. मेळघाटातही स्थलांतर रोखण्यासाठी व स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीसाठी व्यापक स्वरूपात कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर