शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

निधी द्या, आम्ही दोन नव्हे चार टक्के देतो!

By admin | Updated: March 21, 2015 01:08 IST

दलितवस्ती सुधार योजनेतून निधी न मिळाल्याप्रकरणी शिवसेनेचे राजू मानकर, रिपाइंचे प्रदीप दंदे

अमरावती : दलितवस्ती सुधार योजनेतून निधी न मिळाल्याप्रकरणी शिवसेनेचे राजू मानकर, रिपाइंचे प्रदीप दंदे यांनी महापौरांना लक्ष्य करुन ‘निधी द्या, आम्ही दोन नव्हे तर चार टक्के देतो’ असे म्हणून खळबळ उडवून दिली. यावेळी टक्केवारीचा शब्दप्रयोग सभागृहात करणे योग्य नाही, असे सांगून विलास इंगोले, चेतन पवार यांनी महापौरांची पाठराखण केली.दलितवस्ती सुधार योजनेत काही जवळच्या सदस्यांना निधी वाटप करण्यात आल्याचा आरोप प्रदीप दंदे, राजू मानकर यांनी केला. ज्यांनी टक्केवारी कबूल केली त्यांच्याच वाट्याला हा निधी आल्याचे हे दोघेही म्हणाले. दलितवस्ती निधीतून का डावलले] असा सवाल विचारणाऱ्या राजू मानकरांना शांत राहण्याचा सल्ला विलास इंगोले यांनी दिला. महापालिकेत दलितवस्ती सुधार योजनेचा आलेला निधी तोकडा आहे. पुन्हा निधी आल्यास ज्या सदस्यांना निधी मिळाला नाही त्यांना तो दिला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, प्रदीप दंदे यांनी अमरावतीत कोल्हापूरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, सर्वांना समान न्याय द्या? अशी मागणी केली. एकाच प्रभागात निधीचे वाटप करताना दुसऱ्या सदस्यांना विश्वासात का घेतले नाही, यावरही आक्षेप नोंदविला. निर्मला बोरकर, अंबादास जावरे यांनीसुद्धा निधीवाटपात गोंधळ असल्याचा आरोप केला. दरम्यान विलास इंगोले यांनी झालेली चर्चा कार्यवृत्तांतात घेऊ नये, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्यात.