शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २०  लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळिराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा, यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही रविवारी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.तिवसा तालुक्यातील दिवाणखेड, मार्डी, चेनुष्ठा, जहागिरपुर, बोर्डा, आखतवाडा, धामंत्री, उंबरखेड, तारखेड, मोझरी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २०  लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळिराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथे व्यायामशाळा, वाचनालय, दिवाणखेड-परसोडा रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण, नाला खोलीकरण आदींच्या कामांसाठीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी  दिले. कुऱ्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, निवासस्थानाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, हरिजन वस्तीतील सौंदर्यीकरण, स्थानिक रस्त्याचे काँक्रीटीकरण, हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी कामे १ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन त्यांनी केले.  

चेनुष्ठा येथे १ कोटी ५५ लाखांचा निधीकुऱ्हा-चेनुष्ठा-बोर्डा येथे लहान पुलाचे बांधकाम, रस्ता काँक्रीटीकरण, रस्ता सुधारणेच्या १ कोटी ५५  लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन ना. ठाकूर यांनी केले. बोर्डा-शिदवाडी येथील ३८ लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे, आखतवाडा-धामंत्री रस्ता, उंबरखेड ते तारखेड रस्ता व नालीचे ३६ लक्ष निधीतून बांधकाम, दापोरी-जावरा रस्ता व पुलाचे १  कोटी ५० लक्ष निधीतून बांधकाम व मोझरी ते शेंदूरजना बाजार व  मोझरी गावातील रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तहसीलदार वैभव फरतारे  उपस्थित होते.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर