पालकमंत्री : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महोत्सवअमरावती : चिखलदरा पर्यटन महोत्सव हा लोकांचा महोत्सव व्हावा, यासाठी नगर परिषद, जिल्हा प्रशासन व इतर यंत्रणांनी सकारात्मक रितीने काम करावे. या पर्यटन महोत्सवासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित चिखलदरा महोत्सवाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी के.पी.परदेशी यांनी यापूर्वीच्या झालेल्या बैठकांची माहिती दिली. त्यामध्ये महोत्सवात आयोजित पोस्टर प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना सहभागी करावे, अशी सूचना पालकमंत्र्यानी दिली. महोत्सवाच्या अनुषंगाने आदिवासी विभाग, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणांनी अनुषंगिक सुविधा द्याव्यात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सवाच्या तीनही दिवसांत कमी दरात पर्यटकांना खाद्य विशेष पदार्थांची सुविधा द्यावी. वन विभागानेदेखील जंगल सफारीसाठी पुरेशा प्रमाणात वाहन उपलब्ध करून द्यावेत. मुख्यमंत्र्यांना या पर्यटनासाठी आमंत्रित करण्यात येत असून फेब्रुवारीच्या ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान महोत्सव होणार आहे.यावेळी चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या फेसबुक पेजचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगर परिषद चिखलदऱ्याचे अध्यक्ष राजेंद्रसिह सोमवंशी व इतर पदाधिकारी, एमटीडीसीच्या क्षीप्रा वोरा, समन्वयक येवतीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी निधी कमी पडू देणार नाही
By admin | Updated: January 9, 2016 00:26 IST